
आज मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अटल सेतू सागरी पुलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे. या पुलामुळे इन्फ्रास्ट्रक्चर आणि मुंबईतील वाहतूक व्यवस्थेला काय फायदा होणार आहे? ते जाणून घ्या.

2017 साली महाराष्ट्र सरकारने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (MMRDA) शिवडी-न्हावा शेवा पूल बांधण्याची जबाबदारी दिली. जापान इंटरनॅशनल कॉर्पोरेशन एजन्सनीने हा ब्रिज बांधायला 18 हजार कोटी रुपये कर्ज दिलं.

दक्षिण मुंबईतील शिवडी येथून सुरु होणारा हा ब्रिज ठाणे खाडी करुन रायगड जिल्ह्यातील उरण येथील न्हावा शेवा येथील चिरले गावात संपणार आहे.

या ब्रिजमुळे तीन ठिकाणांना सर्वात जास्त फायदा होणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आणि मुंबई-गोवा हायवे. मुंबईतून बाहेर जाणारे आणि मुंबईत येणाऱ्यांचा यामुळे प्रवासाचे काहीतास वाचणार आहेत.

या ब्रिजमुळे मुंबईतून नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवर गर्दीच्यावेळी सुद्धा काही मिनिटात पोहोचता येईल. आतापर्यंत पनवेल मुंबईवरुन खूप लांब होतं. ते सुद्धा फार जवळ येणार आहे.