
अज्ञात वाहनाने दुचाकीवरील दोघांना चिरडल्याची घटना बीडच्या घाटसावळीजवळ घडली आहे.

या घटनेत दोघांचा मृत्यू झालाय. शेख शाहिद सलीम बागवान आणि हाफिज मारुफ शफीक फारुकी असं मृतांची नावे आहेत.

परळीहुन बीडकडे येत असताना अज्ञात वाहनाने चिरडले आहे.

अपघात एवढा भीषण होता की दुचाकी अक्षरशः चकनाचूर झालीय.

अपघातानंतर मृतांच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केलीय.