Parli Vaijnath Temple : पहिल्या सोमवारी परराज्यातून भाविक वैद्यनाथ मंदिरात दर्शनासाठी

परळी वैजनाथ मंदिर आज श्रावणाच्या पहिल्या सोमवारी चांगल्या पद्धतीने सजवण्यात आलं आहे. आज पहिल्या दिवशी मंदिरात अधिक गर्दी पाहायला मिळत आहे.

| Updated on: Aug 21, 2023 | 7:55 AM
1 / 4
 आज श्रावणातील पहिला सोमवार आहे, त्या निमित्ताने बीडच्या परळीतील वैद्यनाथ मंदिर आकर्षक अशा विद्युत रोषणाई आणि फुलांच्या आरासाने सजले आहे.

2 / 4
मंदिराच्या गाभाऱ्यात विविध प्रकारच्या फुलांची आरास करून मंदिर परिसर प्रसन्न झाले आहे. तब्बल 25 क्विंटल फुल यासाठी लागले असून यात निशिगंधा, गुलाब, जरबेरा, झेंडू यासह विविध प्रकारच्या फुलांचा समावेश आहे.

3 / 4
धनंजय मुंडे यांच्या नाथ प्रतिष्ठानच्या वतीने ही आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांची आरास सजवण्यात आलीय. पुणे, हैदराबाद आणि सोलापूर या ठिकाणाहून ही फुलं आणण्यात आलीय. राज्याचं नाही तर परराज्यातून भाविक वैद्यनाथ मंदिरात दर्शनासाठी येत असतात.

4 / 4
भाविकांची सोय व्हावी, याकरिता मंदिर कमिटीने व्यवस्था केलीय. पिण्याच्या पाण्यासह सुरक्षेच्या दृष्टीने मंदिर परिसरात शंभरहून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे आणि पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे.