Beer Bottle Ridges: 133 वर्ष जुने सीक्रेट! Beer बॉटलच्या झाकणाला 21 कडाच का असतात?

Beer Bottle Caps 21 Ridges: बिअर खरेदी करताना तिच्या झाकणाकडं कुणाचंच लक्ष नसतं. ते झाकणं झटकन काढून बिअर तोंडाला लावली जाते. पण तुम्ही बिअरच्या 'क्राऊन कॅप'कडे लक्ष दिले तर त्यावर 21 कडा मोजता येतील. का असतात झाकणाला 21 कडा?

| Updated on: Dec 18, 2025 | 2:50 PM
1 / 6
बिअरचे झाकण अंगठीने, दातांनी, किचन की अथवा ओपनरच्या सहाय्याने उघडण्याची कसरत अनेक जण करतात. काही महारथी तर अशा काही खतरनाक ट्रीक वापरतात की आपण थक्क होतो. पण बिअर बॉटलचे झाकण उघडताना त्यावरील क्राऊन कॅपकडे कुणाचच लक्ष जात नाही. या क्राऊन कॅपला 21 कडा असतात. पण त्या 20 अथवा 22 का नसतात. 21 चं कडा का असतात? काय आहे त्यामागील लॉजिक, काय आहे शास्त्रीय कारण?

2 / 6
अनेकदा काचेच्या बाटलीवर धातुचे सील लावलेले तुम्हाला दिसते. ते अगदी पॅक असते. त्यातील पेय पदार्थ बाहेर येऊ नये यासाठी ही कॅम्प बसवण्यात येते. ते काढण्यासाठी बहुधा ओपनरचा वापर करण्यात येतो. या झाकणाला क्राऊन कॅप अथवा कॉर्क असे म्हणतात.

3 / 6
तुम्हाला हे वाचून धक्का बसेल की या काचेच्या बॉटलवरील झाकणाला 21 कडा असतात. विशेष म्हणजे हे डिझाईन आजकालचे नाही तर वर्ष 1892 पासून हे डिझाईन सुरु आहे. या 21 कडांच्या पॅटर्नचे खास महत्त्व आहे.

4 / 6
 1892 साली विलियम पेंटर यांनी आधुनिक बिअर कॅपचा शोध लावला. पेंटर यांनी क्राऊन कॉर्क अँड सील कंपनीची स्थापन केली. ही कंपनी तेव्हापासून बीअर बॉटलवरील झाकण तयार करत आहे. पण हे झाकण अत्यंत वैज्ञानिक पद्धतीने तयार करण्यात आले आहे.

5 / 6
विलियम पेंटर यांनी अशी मशीन तयार केली जी कॅन आणि पेय पदार्थांच्या बाटलीला सील करू शकेल. विलियम पेंटर बाल्टिमोर येथे क्राऊन कॉर्क वा क्राऊन कॅप अँड कंपनी चालवत होते. त्यांनी बिअरवरील झाकण तयार करण्यासाठी अनेक प्रयोग केले.

6 / 6
बिअर ताजी आणि कार्बनयुक्त ठेवण्यासाठी पेंटर यांनी अनेक वर्षे वेगवेगळ्या कडांची संख्या वापरुन प्रयोग केले. कमी कडांमुळे झाकण कमकुवत होते आणि बिअर लीक होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तर जास्त कडांमुळे झाकण आणि बॉटल तडकण्याची भीती होती. मग संशोधनाअंती 21 कडांचे झाकण हे दोन्ही परिस्थितीत चांगले असल्याचे सिद्ध झाले.