
अभिनेत्री काजोल फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असते. एक काळ असा होता, जेव्हा काजोल तिच्या खासगी आयुष्यामुळे तुफान चर्चेत होती.

अजय याच्यासोबत लग्न करण्याआधी काजोल श्रीमंत उद्योजकाला डेट करत होती. सध्या सर्वत्र काजोल आणि तिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.अजय याच्यासोबत लग्न करण्याआधी काजोल तिच्या एका मित्राला डेट करत होती.

या गोष्टीचा खुलासा खुद्द अभिनेत्रीने एका मुलाखतीत केला होता.काजोल मित्र कार्तिक मेहता याला डेट करत होती. पण कार्तिक आणि अजय यांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अजय आणि काजोल यांनी लग्न केलं. 1999 मध्ये काजोल आणि अजय यांनी लग्न केलं. दोघांना एक मुलगी नीसा देवगन आणि मुलगा युग देवगन आहे.

काजोल पूर्वीप्रमाणे बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.