AC चे बिल येईल अर्ध्यापेक्षा कमी, आजच बदला रात्रीची एक सेटिंग

रात्री झोपताना एसी नक्की किती डिग्रीवर असावा? १६ की २४? जाणून घ्या वीज बिल वाचवण्याची ही सोपी ट्रिक आणि एसीची योग्य सेटिंग, ज्यामुळे तुमची झोपही होईल सुखाची आणि पैशांचीही होईल मोठी बचत.

| Updated on: May 25, 2026 | 3:02 PM
1 / 6
उन्हाळ्याच्या कडक उन्हात एसी (Air Conditioner) आपल्याला मोठा दिलासा देतो. एसी चालू केल्यावर काही मिनिटांतच खोली थंड होते. अनेक जण रात्री शांत झोप लागण्यासाठी एसी थेट १६ डिग्रीवर सेट करतात.

उन्हाळ्याच्या कडक उन्हात एसी (Air Conditioner) आपल्याला मोठा दिलासा देतो. एसी चालू केल्यावर काही मिनिटांतच खोली थंड होते. अनेक जण रात्री शांत झोप लागण्यासाठी एसी थेट १६ डिग्रीवर सेट करतात.

2 / 6

पण, रात्री झोपताना नक्की किती तापमान ठेवावे, एसीचे नेमके योग्य सेटिंग काय असावे? १६, २० की २४ डिग्री कोणते तापमान योग्य असते, याबद्दल आज आपण जाणून घेऊया. ज्यामुळे खोलीही थंड राहील आणि विजेचे बिलही आवाक्यात येईल.

3 / 6

१६ डिग्री सेल्सिअस या तापमानावर एसी खोली जलद थंड करतो हे खरे आहे. मात्र, यामुळे एसीच्या कॉम्प्रेसरवर प्रचंड ताण पडतो. परिणामी, तुमचे विजेचे बिल कमालीचे वाढते. तसेच २० डिग्री सेल्सिअस या तापमानावरही विजेचा वापर जास्तच होतो. शिवाय, मध्यरात्रीनंतर खोली अति थंड झाल्यामुळे तुमची झोपमोड होऊ शकते.

4 / 6

तज्ज्ञांच्या मते, २४ डिग्री सेल्सिअस हे मानवी शरीरासाठी अत्यंत आरामदायक आणि स्थिर तापमान आहे. या सेटिंगवर एसी चालवल्यास खोलीत योग्य प्रमाणात थंडावा राहतो आणि कॉम्प्रेसरवर अतिरिक्त ताण पडत नाही, ज्यामुळे विजेच्या बिलात मोठी बचत होते.

5 / 6

अनेक जण रात्री झोपताना वारंवार कधी १६, कधी २२, तर कधी २४ असे एसीचे तापमान बदलतात. असे केल्याने एसीवर लोड येतो. त्याऐवजी एकाच स्थिर तापमानावर एसी चालू ठेवावा.

6 / 6

झोपण्याच्या ३० मिनिटे आधी एसी २२ किंवा २३ डिग्रीवर ठेवून खोली छान थंड करून घ्या. त्यानंतर झोपताना तो २४ डिग्रीवर सेट करा. रात्री झोपताना एसीमधील स्लीप मोड नक्की ऑन करा. हा मोड रात्रीच्या वेळेनुसार हळूहळू तापमान १-२ डिग्रीने वाढवतो. यामुळे पहाटेच्या वेळी जास्त थंडी वाजत नाही आणि विजेचीही मोठी बचत होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us