AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Bajpayee : दारूच्या नशेत मनोज बाजपेयीनं नसीरुद्दीन शाह यांना दिलेला त्रास, म्हणाला, त्यांनी मला मारलं…

Manoj Bajpayee On Naseeruddin Shah : मनोज बाजपेयी यांनी नुकत्याच एका मुलाखतीत नसीरुद्दीन शाह यांना किस्सा सांगितला आहे.

Manoj Bajpayee : दारूच्या नशेत मनोज बाजपेयीनं नसीरुद्दीन शाह यांना दिलेला त्रास, म्हणाला, त्यांनी मला मारलं...
| Updated on: Nov 26, 2026 | 4:20 PM
Share

बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते नसीरुद्दीन शाह आणि मनोज बाजपेयी हे दोघेही आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखले जातात. दोघांनीही आपल्या अभिनयाच्या जोरावर हिंदी चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र, या दोन कलाकारांची पहिली भेट काही फारशी सुखद नव्हती. एका पार्टीत दारूच्या नशेत असलेल्या मनोज बाजपेयी यांनी नसीरुद्दीन शाह यांना इतके प्रश्न विचारले की, त्यांचा संयम सुटला. मनोज बाजपेयी यांनी एका मुलाखतीत हा मजेशीर किस्सा सांगितला आहे.

मनोज बाजपेयी सध्या त्यांच्या ‘लास्ट मॅन इन टॉवर’ या वेबसीरिजच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. याचदरम्यान ‘द एचएफएफ न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपल्या अभिनयप्रवासातील अनेक आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी नसीरुद्दीन शाह यांच्यासोबतच्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला.

‘बँडिट क्वीन’च्या पार्टीत झाली पहिली भेट

मनोज बाजपेयी यांनी सांगितलं की, शेखर कपूर दिग्दर्शित ‘बँडिट क्वीन’ चित्रपटातील मानसिंगची भूमिका सुरुवातीला नसीरुद्दीन शाह यांना ऑफर करण्यात आली होती. मात्र, त्यांनी ही भूमिका नाकारली आणि त्यानंतर ती मनोज बाजपेयी यांच्याकडे आली. चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झाल्यानंतर आयोजित पार्टीत दोघांची पहिली भेट झाली. याबद्दल सांगताना मनोज म्हणाले, ‘त्या काळात मी खोडकर स्वभावाचा होतो. ‘बँडिट क्वीन’च्या रॅप-अप पार्टीच्या वेळी नसीर साहेब दिल्लीत होते. त्यामुळे शेखर कपूर यांनी त्यांना पार्टीत बोलावलं आणि चित्रपटात त्यांची भूमिका साकारलेल्या तरुण अभिनेत्याची भेट घालून दिली. मात्र, ते येईपर्यंत आम्ही सगळ्यांनी मोफत मिळालेली दारू प्यायला सुरुवात केली होती. मीसुद्धा दारूच्या नशेत होतो.’

मनोज यांनी पुढे सांगितलं की, त्या काळात नसीरुद्दीन शाह इंग्रजी नाटकांमध्ये काम करत असत. त्यांना पाहताच मनोज यांनी इंग्रजी थिएटरबद्दल प्रश्न विचारायला सुरुवात केली. ते नसीरुद्दीन शाह यांच्या मागे-मागे फिरत होते आणि वारंवार एकच प्रश्न विचारत होते की, तुम्ही इंग्रजी नाटकांमध्ये काम का करता? मनोज यांच्या या वागण्यामुळे नसीरुद्दीन शाह चांगलेच वैतागले होते. ते त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होते. इतकंच नाही, तर मनोज यांच्या मित्रांनाही नसीरुद्दीन शाह यांचा राग अनावर होईल आणि ते मनोज यांना मारतील, अशी भीती वाटत होती.

या प्रसंगाची आठवण सांगताना मनोज म्हणाले, ‘नसीरुद्दीन शाह खूप रागीट स्वभावाचे आहेत. त्या दिवशी माझे सगळे मित्र मला त्यांच्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करत होते. नाहीतर त्यांनी मला खरंच मारलं असतं. ते मला टाळत होते आणि ‘मला या माणसाशी बोलायचं नाही’, असं म्हणत होते.’

Follow Us
शरद पवार रुग्णालयात दाखल, प्रफुल्ल पटेलांच्या भेटीने राजकीय वर्तुळात..
शरद पवार रुग्णालयात दाखल, प्रफुल्ल पटेलांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
जपानचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ मुंबईत दाखल; राहुल नार्वेकरांसोबत बैठक
जपानचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ मुंबईत दाखल; राहुल नार्वेकरांसोबत महत्त्वपूर्ण चर्चा, कारण काय?
शक्तीपीठ प्रकल्पाविरोधात शेतकरी आक्रमक! सलग तिसऱ्या दिवशीही जमीन मोजणी
शक्तीपीठ प्रकल्पाविरोधात शेतकरी आक्रमक! सलग तिसऱ्या दिवशीही जमीन मोजणी रोखली, पोलिसांशी झटापट
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला पुन्हा लांबणीवर; कारण काय?
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला पुन्हा लांबणीवर; सुनावणी पुढे ढकलली! कारण काय?
सोलापूर जिल्हा बँक निवडणुकीत मतांची चोरी? संविधान पायदळी तुडवल्याचा...
Solapur : सोलापूर जिल्हा बँक निवडणुकीत मतांची चोरी? धैर्यशील मोहिते पाटलांचा खळबळजनक आरोप; संविधान पायदळी तुडवल्याचा दावा
सुप्रिया सुळे तातडीने ब्रीच कँडी रुग्णालयाकडे रवाना; शरद पवारांच्या...
सुप्रिया सुळे तातडीने ब्रीच कँडी रुग्णालयाकडे रवाना; शरद पवारांच्या प्रकृतीबाबत दिली मोठी अपडेट!
धारावीकरांसाठी उद्धव ठाकरे मैदानात! अदानी प्रकल्पाविरोधात मोठं आंदोलन
धारावीकरांसाठी उद्धव ठाकरे मैदानात! अदानी प्रकल्पाविरोधात मोठं आंदोलन, नेमक्या काय आहेत मागण्या?
10 कोटींच्या मागणीचा व्हिडिओ व्हायरल, देवराम लांडेंचा राष्ट्रवादीला..
10 कोटींच्या मागणीचा व्हिडिओ व्हायरल, देवराम लांडेंचा राष्ट्रवादीला रामराम!
शिवरायांच्या गडकिल्ल्यांसाठी सरकारचा पुढाकार; एकनाथ शिंदेंनी सांगितला
शिवरायांच्या गडकिल्ल्यांसाठी सरकारचा पुढाकार; एकनाथ शिंदेंनी सांगितला खास संकल्प
पुणे कोर्टाबाहेरील हल्ल्यावेळी हल्लेखोरांची घोषणाबाजी; मंदार किवळे....
Pune : शुभम दादा, तुझ्या खुनाचा बदला घेतला... पुणे कोर्टाबाहेरील हल्ल्यावेळी हल्लेखोरांची घोषणाबाजी; मंदार किवळेंच्या जबाबातून धक्कादायक माहिती समोर