AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जळगाव जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता गडद

गोंदियात धान खरेदीला शेतकऱ्यांचा प्रतिसाद. 51 हजारांवर नोंदणी. धान विक्रीचे पैसे 48 तासांत मिळणार? पुढील एक-दोन दिवसांत अंमलबजावणीची शक्यता आहे. गोंदियात 1 लाख 56 हजार क्विंटलहून अधिक धान खरेदी.

जळगाव जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता गडद
draught
| Updated on: Nov 26, 2026 | 4:16 PM
Share

जळगाव जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता गडद झाली आहे. पाण्याअभावी शेतातील पीकं पूर्णपणे वाळत असल्याचे भीषण वास्तव आहे. जामनेर तालुक्यातील गोंदेगाव येथे दुष्काळामुळे शेतकऱ्यांचा पांढरं सोनं असलेल्या कपाशीचं मोठं नुकसान झालं आहे. पावसा अभावी साडे चार एकर वरील कपाशीची वाढ खुंटूली असून पूर्णपणे शेतातील कपाशीचे पीक पूर्णपणे वाळले असल्याचे चित्र आहे. पाण्याअभावी हाता तोंडाशी आलेला घास हिरावून गेला असून लागवड खर्चही निघणार नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात आहे. सरकारने अग्रीम 5000 रुपयांची मदतही तुटपुंजी असून नुकसानीची भरपाई लवकरात लवकर मिळावी ही मागणी केली आहे. दुष्काळामुळे झालेल्या नुकसानीने शेतकरी हवालदिल झाले असून जगायचं तरी कसं असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. मजुरीचा खर्चही परवडत नसल्याने शेतात जळालेली कपाशी स्वतः शेतकऱ्यांना उपटून फेकण्याची वेळ आल्याचे पाहायला मिळत आहे.

गोंदियात धान खरेदीला शेतकऱ्यांचा प्रतिसाद. 51 हजारांवर नोंदणी. धान विक्रीचे पैसे 48 तासांत मिळणार? पुढील एक-दोन दिवसांत अंमलबजावणीची शक्यता आहे. गोंदियात 1 लाख 56 हजार क्विंटलहून अधिक धान खरेदी. अधिकृत केंद्रांवर नोंदणीचे आवाहन.

कांद्याच्या दरात मोठी घसरण

लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. गेल्या नऊ दिवसांत कांद्याच्या दरात प्रतिक्विंटल 1 हजार 749 रुपयांची घसरण झाली आहे. कांद्याचे दर चार हजार रुपयांच्या आत आहेत. देशांतर्गत बाजारपेठेत मागणीच्या तुलनेत कांद्याचा पुरवठा अधिक आहे तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाकिस्तानचा कांदा भारतीय कांद्यापेक्षा 1 हजार 500 ते 2 हजार रुपयांनी स्वस्त आहे. यामुळे लाल कांद्याला कमाल 3 हजार 951, किमान 1 हजार 580, तर सरासरी 3 हजार 400 रुपये प्रतिक्विंटल दर आहे. बाजारभावातील घसरणीमुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त आहे. कांद्याचे दर स्थिर ठेवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने हस्तक्षेप करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.

Follow Us
शरद पवार रुग्णालयात दाखल, प्रफुल्ल पटेलांच्या भेटीने राजकीय वर्तुळात..
शरद पवार रुग्णालयात दाखल, प्रफुल्ल पटेलांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
जपानचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ मुंबईत दाखल; राहुल नार्वेकरांसोबत बैठक
जपानचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ मुंबईत दाखल; राहुल नार्वेकरांसोबत महत्त्वपूर्ण चर्चा, कारण काय?
शक्तीपीठ प्रकल्पाविरोधात शेतकरी आक्रमक! सलग तिसऱ्या दिवशीही जमीन मोजणी
शक्तीपीठ प्रकल्पाविरोधात शेतकरी आक्रमक! सलग तिसऱ्या दिवशीही जमीन मोजणी रोखली, पोलिसांशी झटापट
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला पुन्हा लांबणीवर; कारण काय?
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला पुन्हा लांबणीवर; सुनावणी पुढे ढकलली! कारण काय?
सोलापूर जिल्हा बँक निवडणुकीत मतांची चोरी? संविधान पायदळी तुडवल्याचा...
Solapur : सोलापूर जिल्हा बँक निवडणुकीत मतांची चोरी? धैर्यशील मोहिते पाटलांचा खळबळजनक आरोप; संविधान पायदळी तुडवल्याचा दावा
सुप्रिया सुळे तातडीने ब्रीच कँडी रुग्णालयाकडे रवाना; शरद पवारांच्या...
सुप्रिया सुळे तातडीने ब्रीच कँडी रुग्णालयाकडे रवाना; शरद पवारांच्या प्रकृतीबाबत दिली मोठी अपडेट!
धारावीकरांसाठी उद्धव ठाकरे मैदानात! अदानी प्रकल्पाविरोधात मोठं आंदोलन
धारावीकरांसाठी उद्धव ठाकरे मैदानात! अदानी प्रकल्पाविरोधात मोठं आंदोलन, नेमक्या काय आहेत मागण्या?
10 कोटींच्या मागणीचा व्हिडिओ व्हायरल, देवराम लांडेंचा राष्ट्रवादीला..
10 कोटींच्या मागणीचा व्हिडिओ व्हायरल, देवराम लांडेंचा राष्ट्रवादीला रामराम!
शिवरायांच्या गडकिल्ल्यांसाठी सरकारचा पुढाकार; एकनाथ शिंदेंनी सांगितला
शिवरायांच्या गडकिल्ल्यांसाठी सरकारचा पुढाकार; एकनाथ शिंदेंनी सांगितला खास संकल्प
पुणे कोर्टाबाहेरील हल्ल्यावेळी हल्लेखोरांची घोषणाबाजी; मंदार किवळे....
Pune : शुभम दादा, तुझ्या खुनाचा बदला घेतला... पुणे कोर्टाबाहेरील हल्ल्यावेळी हल्लेखोरांची घोषणाबाजी; मंदार किवळेंच्या जबाबातून धक्कादायक माहिती समोर