
गोकर्ण (कर्नाटक): गोकर्ण हे गोव्यापेक्षा शांत असणारे एक सुंदर ठिकाण आहे. ओम बीच, हाफ मून बीच आणि पॅराडाईज बीच हे येथील प्रसिद्ध समुद्रकिनारे आहेत. येथे तुम्ही शांत समुद्रकिनाऱ्यांचा, हिप्पी वाइबचा आणि ट्रेकिंग ट्रेल्सचा आनंद घेऊ शकता.

वेलंकन्नी (तामिळनाडू): धार्मिक स्थळे आणि शांत समुद्र ही वेलंकन्नीची वैशिष्ट्ये आहेत. जर तुम्हाला समुद्रकिनाऱ्यावर चर्च आणि इतर आध्यात्मिक ठिकाणे पहायची असतील तुमच्यासाठी वेलंकन्नी हा चांगला पर्याय आहे.

तावरेकेरे: कर्नाटकमधील तावरेकेरे हे ठिकाण नैसर्गिक सौंदर्याने नटलेले आहे. येथे शांत समुद्र किनारे आहेत. येथे तुम्ही किनाऱ्यावरील गावे आणि स्थानिक संस्कृतीचा अनुभव घेऊ शकता. मुरवंते बीच हा येथील प्रसिद्ध समुद्रकिनारा आहे.

दिवेआगर: दिवेआगर हे महाराष्ट्रातील शांत आणि स्वच्छ समुद्रकिनारा आहे. स्वच्छ वाळू, सीफूड आणि कमी गर्दी हे या ठिकाणाचे वैशिष्ट्ये आहे. तुम्ही कमी बजेटमध्ये शांततेच्या शोधात असाल, हे ठिकाण तुमच्यासाठी खास आहे.

गोव्याऐवजी वरील ठिकाणे निवडल्यास तुम्हाला स्थानिक संस्कृती आणि पारंपारिक अन्नपदार्थ अनुभवण्याची संधी मिळते. तसेच वरील ठिकाणी कमी गर्दी असते, त्यामुळे शांत किनाऱ्यांवर तुम्हाला मानसिक शांती मिळू शकते.