OTT वर काही दमदार कंटेंट पहायचं असेल, तर ही यादी वाचा; महिनाभर होईल टाइमपास

विविध ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर दर आठवड्याला नवनवीन कंटेंट स्ट्रीम होत असतो. प्रेक्षकांना प्रत्येक जॉनरमध्ये विविध चित्रपट किंवा सीरिज पहायला मिळतात. परंतु त्यातलं नेमकं काय पहायचं, असा प्रश्न अनेकांना पडतो. दिवाळीच्या सुट्टीत तुम्ही घरी बसून ओटीटी प्लॅटफॉर्मवर दमदार कंटेंट पाहू शकतो. या यादीत एकापेक्षा एक जबरदस्त चित्रपटांचा समावेश आहे.

| Updated on: Oct 20, 2025 | 11:43 AM
1 / 8
लोका: चाप्टर 1: चंद्रा-  दाक्षिणात्य अभिनेत्री कल्याणी प्रिदर्शनचा हा गाजलेला चित्रपट सध्या ओटीटीवर पहायला मिळतोय. या चित्रपटाला थिएटरमध्ये प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. अवघ्या 30 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने तब्बल 300 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. हा चित्रपट तुम्ही जिओ हॉटस्टारवर पाहू शकता.

2 / 8
केसरी: चाप्टर 2- या चित्रपटात अक्षय कुमार, अनन्या पांडे आणि आर. माधवन यांच्या मुख्य भूमिका आहेत. या तिघांनी चित्रपटात दमदार कामगिरी केली. हा चित्रपट तुम्ही जिओ हॉटस्टारवर पाहू शकता.

3 / 8
टूरिस्ट फॅमिली- या चित्रपटाची क ता एका कुटुंबाभोवती फिरते. श्रीलंकेत आर्थिक समस्यांशी सामना करणारं हे कुटुंब भारतात येतं. अत्यंत कमी बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली होती. तुम्ही अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर हा चित्रपट पाहू शकता.

4 / 8
ऑफिसर ऑन ड्युटी- या मल्याळम क्राइम थ्रिलरची कथा पाहून तुमच्या अंगावर काटा येईल. कथा आणि त्यातील भूमिका तुमची मनं जिंकून घेतील. जर तुम्हाला सस्पेन्स थ्रिलर पहायची आवड असेल तर हा चित्रपट तुम्ही आवर्जून पहा. याची कथा कोचीमध्ये राहणाऱ्या इन्स्पेक्टरभोवती फिरते. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्ही हा चित्रपट पाहू शकता.

5 / 8
होमबाऊंड- ईशान खट्टर आणि विशाल जेठवा यांचा हा चित्रपट अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. अभिनेत्री जान्हवी कपूरने यात दमदार अभिनय केला आहे. दोन मुलं आणि त्यांच्या संघर्षाची कथा यात दाखवण्यात आली आहे. अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर हा चित्रपट उपलब्ध आहे.

6 / 8
कालीधर लापता- या चित्रपटा अभिषेक बच्चनने मुख्य भूमिका साकारली आहे. अल्झाइमर असलेल्या व्यक्तीला त्याचे कुटुंबीय कुंभमेळ्या सोडून देतात. त्याचीच ही अनोखी कथा आहे. हा चित्रपट झी5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.

7 / 8
सुपरबॉइज ऑफ मालेगाव- या चित्रपटाची कथा महाराष्ट्रातील मालेगावमध्ये राहणाऱ्या मित्रांची आहे. फिल्म इंडस्ट्रीत आऊटसाइडर असलेल्यांच दु:ख आणि संघर्ष काय असतो, याचं चित्रण यामध्ये करण्यात आलं आहे. प्रेक्षक आणि समिक्षकांकडून या चित्रपटाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. प्राइम व्हिडीओ हा चित्रपट तुम्ही पाहू शकता.

8 / 8
कोर्ट: स्टेट वर्सेस अ नो बडी- या तेलुगू लीगल ड्रामामध्ये देशाच्या कायदा व्यवस्थेवरील कथा दाखवण्यात आली आहे. पॉक्सो अॅक्टचा दुरुपयोग कसा केला जातो, याचं चित्रण त्यात केलंय. नेटफ्लिक्सवर तुम्ही हा चित्रपट पाहू शकता.