
खजुरामध्ये कॅलोरी, कार्ब्स, फायबर, प्रोटीन, पोटॅशियम, मॅग्नीशियम, कॉपर, मॅगनीज, आयरन, विटामिन बी6 सह अँटीऑक्सीडेंट असतात. थंडीच्या सीजनमध्ये एक्सपर्टने सांगितलेल्या या पद्धतीने तुम्ही याचा डाएटमध्ये समावेश करु शकता. ( Credit : Pexels )

जयपुरच्या न्यूट्रिशनिस्ट डॉक्टर मेधावी गौतम यांनी सांगितलं की, खजुराने शरीराला एनर्जी मिळते. थंडीच्या सीजनमध्ये खजुर खाल्ल्याने सर्दी, खोकल्यापासून बचाव होतो. रात्री दुधासोबत खजुर खाणं चांगलं आहे. यात नॅचरल शुगर ग्लूकोज, सुक्रोज आणि फ्रुक्टोज असतात. त्याने एनर्जी मिळायला मदत होते.

एक्सपर्टनुसार, रात्रीच्यावेळी गरम दुधात खजूर उकळवून खाणं फायद्याचं असतं. एकादिवसात तुम्ही 2 ते 3 खजुर खाऊ शकता. यात नॅचुरल शुगर असते. यामुळे वेगळं गोड टाकण्याची आवश्यकता नसते. हे आधीच गोडं असतं.

खजुरात मॅग्नेशियम चांगल्या प्रमाणात असतं. त्यामुळे ज्यांचे स्नायू दुखतात त्यांच्यासाठी खजुर खाणं फायद्याचं आहे. विटामिन ए मुळे नजर चांगली होते. दुधात उकळवून किंवा भिजवून तुम्ही खजुराचं सेवन करु शकता.

खजुरात नैसर्गिक साखर असते. त्यामुळे डायबिटीज रुग्णांनी खजुराचं सेवन टाळलं पाहिजे. कोणाला आरोग्याच्या आधीपासून तक्रारी असतील, तर एक्सपर्टचा सल्ला घ्या. ज्यांना ड्रायफ्रुटसच्या नट्सपासून एलर्जी आहे, त्यांना सुद्धा खजुरामुळे त्रास होऊ शकतो. एकादिवसात 3 ते 4 खजुर खाणं चांगलं नाही. कारण त्यात शुगर असते. त्यामुळे त्यापेक्षा कमी खजुर खाल्ले पाहिजेत.