Bigg Boss : ‘बिग बॉस’ची ट्रॉफी हुकली, पण लोकप्रियतेत अव्वल; या स्पर्धकांनी जिंकली प्रेक्षकांची मनं

बिग बॉस हा टेलिव्हिजन क्षेत्रातील सर्वात लोकप्रिय शोंपैकी एक आहे. या शोमध्ये असे अनेक स्पर्धक आले, जे विजेते तर होऊ शकले नाही पण त्यांनी प्रेक्षकांचं मन जिंकलं. अशा 5 स्पर्धकांबद्दल जाणून घेऊया.

| Updated on: Sep 25, 2026 | 4:31 PM
1 / 5
बिग बॉस च्या 13 व्या सीझनमध्ये झालेली स्पर्धक शहनाज गिल हिचं नाव माहीत नसेल असं खचतिच कोणी असेल. शोमध्ये असतानाही आणि नंतर बाहेर पडल्यावरही ती खूप लोकप्रिय झाली. शोमधील तिची पर्सनॅलिटी लोकांना खूपच आवडली. ती टॉप 5 पर्यंत पोहोचली होती. शहनाजने शो जिंकला नसला, तरी लोकप्रियतेच्या बाबतीत तिने सगळ्यांना मागे टाकलं. आज ती मोठमोठ्या सेलिब्रिटींसोबत काम करत असून खूप यशस्वी आहे.

2 / 5

‘बिग बॉस 9’ मध्ये नोरा फतेहीने वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून प्रवेश केला. ती याशोमध्ये फार काळ टिकू शकली नाही, असं असंल तरीही तिचा जबरदस्त डान्स आणि ग्लॅमरस अंदाजामुळे तिने प्रेक्षकांचं लक्ष नक्कीच वेधून घेतले. या शोमुळे प्रेक्षकांना तिच्या डान्सिंग टॅलेंटची ओळख झाली आणि आज ती बॉलिवूडमधील एक मोठं नाव आहे.

3 / 5

बिग बॉस च्या 13 मध्ये आसिम रियाज हा त्याची पर्सनॅलिटी, ठाम विचारसरणी आणि स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत होता. सिद्धार्थ शुक्लाशी त्याची सतत खडाजंगी झाली मात्र त्यामुळे शो आणखी रंजक बनला. आसिफ हा फनालेपर्यंत पोहोचला. मात्र तो शो जिंकू शकला नाही. फर्स्ट रनर अप ठरला. मात्र नंतर तो खूपच लोकप्रिय झाला.

4 / 5

हिना खानने टीव्हीवरील ‘संस्कारी बहू’च्या प्रतिमेपेक्षा ‘बिग बॉस 11’ मध्ये अगदी वेगळा अंदाज प्रेक्षकांना दाखवला. ती या शोची रनर-अप ठरली होती. ती शो जिंकू शकली नसली तरी तिने प्रेक्षकांची मने नक्कीच जिंकली आणि आज ती एक मोठं नाव आहे.

5 / 5

प्रियंका चाहर चौधरीने ‘बिग बॉस 16’ गाजवलं. तिची ठाम मतं आणि चुकीच्या गोष्टींविरोधात आवाज उठवण्याच्या शैलीमुळे ती बरीच चर्चेत होती. तीच हा शो जिंकेल असं अनेकांना वाटत होतं, पण तसं होऊ शकलं नाही. ती शोमध्ये हरली पण लोकप्रियतेत ती जिंकली. आता ती ‘राइज अँड फॉल’ या रिॲलिटी शोमध्ये दिसेल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us