Bhagyashree Patwardhan net worth: राज घराण्यातील अभिनेत्री भाग्यश्रीची एकूण संपत्ती किती? गणेशोत्सवादरम्यान वडिलांसोबत झाला होता वाद
Bhagyashree Patwardhan net worth: ‘मैंने प्यार किया’ सिनेमातून पदार्पण केल्यानंतर अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. राज घराण्यातून आलेल्या भाग्यश्री या सध्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.

‘मैंने प्यार किया’ चित्रपटात बॉलिवूडचा भाईजान सलमान खानसोबत काम करणारी अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन सध्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. राजघराण्यातून आलेल्या भाग्यश्रीकडे एकूण किती संपत्ती आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. चला जाणून घेऊया...
गणेशोत्सवादरम्यान सांगलीच्या श्री गणपती पंचायतन संस्थानच्या उत्तराधिकारीवरून पटवर्धन कुटुंबातील वाद पेटला. आगमन सोहळ्याच्या अगोदर मुख्य मंदिरात भाग्यश्री पटवर्धन यांनी आरतीचा मान घेतल्यानंतर राजे संतापले. तेव्हा पासून अभिनेत्री भाग्यश्री या चर्चेत आहेत.
‘मैंने प्यार किया’मध्ये सलमान खानसोबत काम केल्यानंतर भाग्यश्री यांना फिल्मफेअरचा बेस्ट फिमेल डेब्यू पुरस्कारही मिळाला होता. त्यानंतर त्यांनी बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट केले आणि आपल्या अभिनय कौशल्याने चाहत्यांना प्रभावित केले.
अनेक अहवालांनुसार, भाग्यश्रीची एकूण संपत्ती सुमारे ३८.३३ कोटी रुपये इतकी असल्याचा अंदाज आहे. भाग्यश्रीची एकूण संपत्ती अधिकृत समोर आलेली नाही.
‘मैंने प्यार किया’नंतर भाग्यश्रीने ‘कैद में है बुलबुल’ आणि ‘त्यागी’ या चित्रपटांमध्ये काम केले. तसेच त्यांनी महेंद्र शाह यांच्या ‘पायल’ या चित्रपटातही भूमिका साकारली. अविनाश वधावन यांच्यासोबतच्या ‘घर आया मेरा परदेसी’ या त्यांच्या चित्रपटालाही प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.