
मकर संक्रांतीच्या दिवशी सर्वच घरांमध्ये भोगीची भाजी बनते. त्यादिवशी याच भाजीचा मान असतो. भोगीच्या भाजीशिवाय संक्रांत पूर्णच होत नाही. भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी याला प्रचंड महत्व असते.

बऱ्याच लोकांना भोगीची भाजी तयार करायची म्हटले की, प्रचंड टेन्शन येते. मात्र, कुकरच्या दोन शिट्ट्यांमध्ये तुम्ही काही वेळात अगदी सोप्प्या पद्धतीने भोगीची भाजी तयार करू शकता.

याकरिता पावटा,हरभरा,गाजर, मटार,बटाटा,ओल्या तुरी,वांगी,घेवडा,बोर,उसाचे छोटे तुकडे,पालक शिवाय हिवाळ्याच्या सर्व भाज्या बारीक कट करून घ्या.

तेल टाकून कुकरमध्ये फोडणी द्या आणि त्यामध्ये बारीक चिरलेल्या भाज्या टाका,काही वेळ सर्व मिक्स करून घ्या आणि मीठ आणि बाकी घरगुती मसाले त्यात टाका.

तुम्हाला भाजी एक पातळ हवी असेल तर जास्त पाणी टाका जर पातळ हवी नसेल तर थोडेच पाणी घाला. यानंतर कुकरचे छाकण लावून टाका आणि दोन शिट्ट्या द्या.दहा मिनिटात तुमची भोगीची भाजी तयार होईल.