
पुन्हा एकदा फरहाना भट्ट आणि कुनिका सदानंदमध्ये जोरदार भांडण पहायला मिळालं. कुनिका म्हणते आम्ही सेल्फिशनेसची प्रतिमा फरहानामध्ये पाहिली. त्यानंतर फरहाना कुनिकाच्या जवळ जाते. तिला बोलते तुम्ही माझ्याशी डायरेक्ट बोला.

कुनिका म्हणते मला जे करायचं आहे, ते मी करणारं, माझी मर्जी. फरहाना ओरडून कुनिकाला बोलते. हे चित्रपटात ठेव, माझ्यासोबत अशी बकवास करु नका.

कुनिका हात जोडून रडण्याच नाटक करते. भांडताना फरहाना आपल्या भाषेची मर्यादा विसरुन जाते.

फरहाना कुनिकाला बोलते, अशनूर आणि अभिषेकचे जाऊन तळवे चाटा. म्हातारी बाई, मी माझ्या लेव्हलवर उतरले तर वीकेंडला तुमचं संपूर्ण खानदान येईल, हे लक्षात ठेव कुनिका.

कुनिका तिला बोलते पॉटी माउथ. सिनिअर अभिनेत्री विषयी फरहानाची भाषा ऐकून युजर्स तिला ट्रोल करतायत.