
बिग बॉस 15 ची विजेती ठरली आहे. प्रतिक सेहेजपाल आणि तेजस्वी प्रकाश हे दोघे बिग बॉस 15 चे टॉप 2 स्पर्धक होते. पण तेजस्वीने प्रतिकपेक्षा जास्त मतं मिळवत बिग बॉसची ट्रॉफी जिंकली.

तेजस्वीने बिग बॉसची ट्रॉफी जिंकल्यानंतर सगळ्यांनीच जल्लोष केला. तेजस्वीला स्वत: ला या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता. पण नंतर तिला खूप आनंद झाला. तो तिच्या चेहऱ्यावर पहायला मिळाला.

ट्रॉफीसोबतच तेजस्वीला 40 लाख रुपयांचं बक्षीसही मिळालेत. तेजस्वी प्रकाशचा बॉयफ्रेंड करण कुंद्रादेखील टॉप 3 मध्ये होता. नंतर तो बाहेर पडला. प्रतिक आणि तेजस्वीमध्ये कांटे की टक्कर पहायला मिळाली. अन् अखेर प्रतिकला मागे टाकत तेजस्वीने बिग बॉसची ट्रॉफी आपल्या नावे केली.

'स्वर्गिनी' आणि 'सिलसिला बदलते रिश्तों' का या टीव्ही मालिकांमध्ये देखील तिने काम केलं आहे. तिने 'खतरों के खिलाडी 10' मध्ये देखील तिने भाग घेतला होता.

लहानपणापासूनच मनोरंजन क्षेत्रात करिअर करायचं ठरवलं असल्याने तिने वयाच्या १८ व्या वर्षी तिच्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. केवळ तिचे वडील गायक असल्याने ती केवळ अभिनेत्रीच नाही तर एक चांगली संगीतकार देखील आहे. तिला सतार आणि इतर वाद्ये वाजवायलाही तिच्या आई बाबांनी शिकवले आहे.