
गार्डन एरिया - बिग बॉसच्या घरात गार्डन एरिया एका मोकळ्या मैदानाप्रमाणे डिझाईन करण्यात आला आहे. यंदाच्या वर्षी जीमसाठी कमी जागा देण्यात आली आहे. यावरून असा संदेश मिळतो की या खेळात टिकून राहण्यासाठी रणनीतीसोबतच स्टॅमिना देखील अत्यंत महत्त्वाचा आहे.

किचन एरिया - बिलिविंग एरिया - लिविंग एरिया घरातील एक असा भाग आहे, जेथे सर्वात जास्त ड्रामा होतो आणि यंदाच्या वर्षी लिविंग एरियाचा लूक देखील आकर्षक आहे. सजावटीमध्ये प्राण्यांपासून प्रेरित डिझाईन्स आणि ठळक रंगांचा उपयोग केला आहे. ज्यामुळे स्पर्धाकांना सतत आठवण येते की या ठिकाणी काहीही सामान्य नाही.ग बॉसचा किचन एरिया नेहमीच वादविवादाचे केंद्र राहिला आहे. मागील सीझनपेक्षा किचन एरिया लहान आहे, परंतु ते अशा प्रकारे डिझाइन केलं आहे की घरातील सदस्यांना एकमेकांच्या जवळ राहावे लागेल, जेणेकरून जेवण आणि कामावरून संघर्ष होण्याची शक्यता आहे.

किचन एरिया - बिग बॉसचा किचन एरिया नेहमीच वादविवादाचे केंद्र राहिला आहे. मागील सीझनपेक्षा किचन एरिया लहान आहे, परंतु ते अशा प्रकारे डिझाइन केलं आहे की घरातील सदस्यांना एकमेकांच्या जवळ राहावे लागेल, जेणेकरून जेवण आणि कामावरून संघर्ष होण्याची शक्यता आहे.

बेडरूम - 'बिग बॉस' घरातील बेडरूम शांततेची अनुभूती देते. विंटेज टच आणि हलक्या रंगांमुळे, ही खोली आरामदायी ठिकाणासारखी वाटते. यावेळी निर्मात्यांनी सिंगल बेड पूर्णपणे काढून टाकले आहेत, आता फक्त डबल बेड आणि एक मोठा बेड आहे ज्यामध्ये तीन स्पर्धक आरामात झोपू शकतात.

असेंबली रूम : 'बिग बॉस'च्या घरात यंदाच्या वर्षी नवीन असेंबली रूम तयार करण्यात आला आहे. यंदाच्या सीजनची थीम 'घरवालों की सरकार' अशी आहे. त्यामुळे या रुममध्ये कोण-कोणत्या विषयांवर चर्चा होणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे...

बाथरूम एरिया: बाथरूमच्या डिझाईनमध्ये कोणतेच बदल करण्यात आलेले नाहीत. पण हा सर्वांत संवेदनशील एरिया आहे. जिथे स्पर्धकांच्या वैयक्तिक वस्तू ठेवल्या जातात आणि गुप्तपणे रणनीती आखल्या जातात.