
बिग बॉस शो सुरू होताच महिला स्पर्धकाच्या चर्चांनी जोर धरला आहे. घरात काही स्पर्धकांसोबत तिचे वाद देखील झाले आहे. ज्याचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफाण व्हायरल होत आहे. अशात तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल की, ती स्पर्धक नक्की होण आहे.

सध्या ज्या स्पर्धकाची चर्चा रंगली आहे, ती दुसरी तिसरी कोणी नसून तान्या मित्तल आहे. तान्या हिला ट्रोल देखील केलं जात आहे. तिच्या चर्चा सध्या तुफान रंगल्या आहे. सध्या सर्वत्र तान्य मित्तल हिची चर्चा रंगली आहे.

सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि उद्योजक तान्या मित्तल सध्या तुफान चर्चेत आहे. तिच्या चर्चेत असण्याचं कारण म्हणजे सलमान खानच्या 'बिग बॉस 19' शोचा भाग असणं. तान्या मित्तलचे इंस्टाग्रामवर 25 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत

तान्या मित्तल ही मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरची रहिवासी आहे आणि तिने खूप कमी वेळात खूप लोकप्रियता मिळवली आहे. लोकप्रियतेसोबतच तिच्याकडे संपत्तीचीही कमतरता नाही. सोशल मीडियावर देखील ती कायम सक्रिय असते.

रिपोर्टनुसार, तान्या हिच्याकडे तब्बल 2 कोटी रुपयांची संपत्ती आहे. वयाच्या 19 व्या वर्षी तान्या 2 कोटींची मालकीण आहे.तिचा 'हँडमेड विथ लव्ह बाय तान्या' नावाचा एक ब्रँड आहे, ज्याद्वारे ती हँडबॅग आणि साडीचा व्यवसाय करते.