
'बिग बॉस 18' फेम स्पर्धक आणि अभिनेत्री शिल्पा शिरोडकर हिला कोरोना झाला आहे. सध्या अभिनेत्रीवर उपचार सुरु आहेत.

कोरोनाची लागण झाल्याच कळताच अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. शिवाय अभिनेत्री मास्क घालण्याचा देखील सल्ला दिला आहे.

अभिनेत्री सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत म्हणाली, 'माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव आली आहे. तुम्ही सुरक्षित राहा आणि मास्क लावा...' असं अभिनेत्रीने सर्वांना आवाहन केलं आहे.

सध्या अभिनेत्रीची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पोस्ट व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी अभिनेत्रीसाठी चिंता व्यक्त करत प्रार्थना केली आहे.

शिल्पा कायम सोशल मीडियवर सक्रिय असते सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.