प्रेमाचं जाळं, लग्नाचा फास, बिग बॉस फेम हिरोईनचा हादरवणारा कांड; त्या तरण्या पोरासोबत घडलं असं की वाचून हादरवून जाल!

बिग बॉस या रिअॅलिटी शोमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सध्या चांगलीच चर्चेत आहे. या अभिनेत्रीने एका मुलाला फसवल्याचा आरोप आहे. तरुणाच्या वडिलांनी थेट पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

| Updated on: Apr 27, 2026 | 3:52 PM
1 / 5
सध्या सगळीकडे बिग बॉसमधील एका स्पर्धकाची चर्चा रंगली आहे. ही अभिनेत्री या रिअॅलिटी शोच्या माध्यमातून घराघरात पोहोचली होती. पण आता त्याची वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. अभिनेत्री विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अभिनेत्रीने ९ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे. नेमकं प्रकरण काय आहे? चला जाणून घेऊया...

2 / 5
'बिग बॉस'मधून घराघरांत पोहोचलेली प्रसिद्ध अभिनेत्री आशू रेड्डी सध्या एका गंभीर आणि धक्कादायक कायदेशीर प्रकरणामुळे अडचणीत आली आहे. एका अनिवासी भारतीय (NRI) सॉफ्टवेअर इंजिनिअरला लग्नाचे आमिष दाखवून तब्बल 9.35 कोटी रुपयांना गंडा घातल्याचा खळबळजनक आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. याप्रकरणी हैदराबादमधील सेंट्रल क्राईम स्टेशन (CCS) मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

3 / 5
मिळालेल्या माहितीनुसार, सत्यनारायण नावाच्या एका व्यक्तीने ही तक्रार दाखल केली आहे. त्यांचा मुलगा लंडनमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर असून 2018 मध्ये त्याची आणि आशू रेड्डीची ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर लवकरच प्रेमात झाले. अभिनेत्रीने संबंधित तरुणाला लग्नाचे वचन दिले होते, असा दावा तक्रारदारांनी केला आहे. मात्र, आता ती आपल्या शब्दावरून फिरली असून तिने तरुणाची मोठी आर्थिक फसवणूक केली आहे.

4 / 5
तक्रारीमध्ये करण्यात आलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत. या एनआरआय तरुणाने लग्नाच्या आमिषापोटी अभिनेत्रीला अनेक महागड्या भेटवस्तू दिल्याचे म्हटले आहे. यामध्ये अभिनेत्रीसाठी खरेदी केलेल्या अनेक आलिशान गाड्या. तिच्या नावे घेतलेले अनेक अपार्टमेंट्स. तब्बल ५ किलो सोने आणि इतर मौल्यवान वस्तू. इतकेच नाही, तर आशू रेड्डीच्या बहिणीनेही या तरुणाकडून ५० लाख रुपयांचे कर्ज घेतले होते, जे अद्याप परत केलेले नाही, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

5 / 5
हैदराबाद पोलिसांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून सध्या तपास सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, हे दोघे काही काळ 'लिव्ह-इन रिलेशनशिप'मध्ये राहत होते असे समजते, मात्र आर्थिक व्यवहारांची माहिती समोर आल्यानंतर हे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे बनले आहे. दुसरीकडे, अभिनेत्री आशू रेड्डी हिने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपली बाजू मांडली आहे. तिच्या मते, हे सर्व दावे खोटे असून तिच्याविरोधात अफवा पसरवल्या जात आहेत. याप्रकरणी ती तक्रारदाराविरुद्ध कायदेशीर कारवाई करणार असल्याचेही तिने स्पष्ट केले आहे.

Follow Us