बिग बॉसच्या घरात धमाका करणाऱ्या छोट्या पुढारीची उंची ऐकून तुम्हीही व्हाल हैराण, घनश्याम दरोडे…
यंदाचे बिग बॉस मराठीचे सीजन चांगलेच चर्चेत असल्याचे बघायला मिळतंय. विशेष म्हणजे हे सीजन धमाका करताना दिसत आहे. अनेक दिग्गज नावे या सीजनमध्ये सहभागी झाली आहेत. बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख हा या सीजनला होस्ट करतोय. रितेशची स्टाईलही लोकांना आवडताना दिसत आहे.
1 / 5

छोटा पुढारी म्हणजेच घनश्याम दरोडे हा बिग बॉस मराठी 5 मध्ये धमाका करताना दिसतोय. नुकताच बिग बॉसच्या घरात एक टास्क झालाय. या टास्कमध्ये तो धमाका करतोय.
2 / 5
अक्षय कुमार हा बिग बॉसच्या मंचावर आला होता. यावेळी त्याने थेट म्हटले होते की, बिग बॉसच्या घरात हा लहान मुलगा कोणाचा आहे? यानंतर रितेश देशमुखने घनश्याम दरोडेची ओळख करून दिली.
3 / 5
छोटा पुढारी उंचीने आणि दिसण्याने लहान असला तरीही तो 22 वर्षांचा आहे. हेच नाही तर छोटा पुढारी हा उच्च शिक्षित तरूण आहे. पदवीपर्यंतचे त्याचे शिक्षण झाले.
4 / 5
छोट्या पुढारीची उंची ही 3 फूट 7 म्हणजेच 112 सेमी इंच आहे. तो दिसण्यास एकदम लहान मुलांसारखा दिसतो. मात्र, तो चांगला गेम खेळताना दिसत आहे.
5 / 5
छोट्या पुढारीला लोक समर्थन करताना दिसत आहेत. सूरज चव्हाण आणि छोट्या पुढारीचे बिग बॉसच्या घरात चांगले नाते बघायला मिळत आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us