Bigg Boss Marathi 6: रितेश देशमुखचा डबल झटका; टॉपचे 2 स्पर्धक बिग बॉसच्या घराबाहेर

'बिग बॉस मराठी 6'च्या घरातून या आठवड्यात एक नाही तर दोन सदस्य एलिमिनेट होणार आहेत. ग्रँड फिनाले जवळ येत असताना घरातील दोन स्पर्धक बाद झाले आहेत. हे दोन स्पर्धक नेमके कोण आहेत, त्याबद्दल जाणून घ्या..

| Updated on: Mar 29, 2026 | 11:50 AM
1 / 5
'बिग बॉस मराठी'चा सहावा सिझन सध्या चांगलाच गाजतोय. विजेतेपद मिळवण्यासाठी स्पर्धकांमध्ये चुरस रंगली आहे. या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरातून एक नव्हे तर दोन सदस्यांना निरोप घ्यावा लागणार आहे.

'बिग बॉस मराठी'चा सहावा सिझन सध्या चांगलाच गाजतोय. विजेतेपद मिळवण्यासाठी स्पर्धकांमध्ये चुरस रंगली आहे. या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरातून एक नव्हे तर दोन सदस्यांना निरोप घ्यावा लागणार आहे.

2 / 5

घरात वाइल्ड कार्ड एण्ट्री केलेल्या संकेत पाठकचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपणार असल्याचं कळतंय. नॉमिनेट झालेल्या सदस्यांपैकी संकेतला सर्वात कमी मतं मिळाल्याचं समजतंय. त्याच्यासोबत आणखी एका स्पर्धकाला घराबाहेर जावं लागणार आहे.

3 / 5

कलर्स मराठीने सोशल मीडियावर नवीन प्रोमो शेअर केला असून त्यात सूत्रसंचालक रितेश देशमुख या आठवड्यातील डबल नॉमिनेशनबद्दल सांगताना दिसतोय. यातील एक सदस्य काटा गँगचा आणि दुसरा टोळीतला सदस्य असेल.

4 / 5

संकेत पाठकसोबत प्रभू शेळके बिग बॉसच्या घराबाहेर जाणार असल्याचं कळतंय. या आठवड्यात संकेत पाठक, प्रभू शेळके आणि रेवा कौरासे हे तीन स्पर्धक 'बॉटम 3'मध्ये होते.

5 / 5

बिग बॉसच्या घरात सध्या तन्वी कोलते, अनुश्री माने, सागर कारंडे, दिपाली सय्यद, राकेश बापट, राखी सावंत यांच्यात विजेतेपदासाठी चुरस रंगली आहे. यापैकी ट्रॉफी कोण आपल्या नावे करणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us