माझ्या स्वप्नातील राणी, अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून चाहते थक्क, होतंय प्रचंड कौतुक
सुंदरी..सुंदरी.., बिग बॉस मराठी 6 मधील प्रसिद्ध अभिनेत्रीच्या लुकने चाहत्यांना लावलं वेड. फोटो पाहून सर्वजण करत आहेत कौतुक. कोण आहे ती?
1 / 5

‘बिग बॉस मराठी’ या गाजलेल्या रिॲलिटी शोमध्ये सहभागी होऊन तन्वी कोलतेने आपल्या दमदार खेळाच्या जोरावर प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.
2 / 5
शोमधील तिच्या खेळाची आणि व्यक्तिमत्त्वाची चांगलीच चर्चा झाली होती. आता पुन्हा एकदा तन्वी चर्चेत आली आहे, ती तिच्या सुंदर फोटोंमुळे.
3 / 5
काही दिवसांपूर्वी तन्वीने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तन्वीचा सुंदर आणि आकर्षक अंदाज पाहायला मिळत आहे.
4 / 5
तिच्या या लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले असून, सोशल मीडियावर तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
5 / 5
तन्वीच्या या फोटोंवर चाहते तिच्या सौंदर्याचे आणि लूकचे कौतुक करताना दिसत आहेत. ‘बिग बॉस मराठी 6’नंतर तन्वीचा सोशल मीडियावरील चाहतावर्गही चांगलाच वाढल्याचे पाहायला मिळत आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us