Tanvi Kolte: ‘बिग बॉस मराठी 6’विजेती तन्वी कोलतेकडे किती संपत्ती? कोकणकन्या किती कमावते?

अभिनेत्री, मॉडेल आणि इन्फ्लुएन्सर तन्वी कोलतेनं बिग बॉस मराठीच्या सहाव्या सिझनचं विजेतेपद पटकावलं आहे. या विजयानंतर तन्वीचा चाहतावर्ग आणखीनच वाढला आहे. तन्वीकडे एकूण किती संपत्ती आहे आणि तिची कमाई कुठून होते, याबद्दल जाणून घ्या..

| Updated on: Apr 22, 2026 | 8:33 AM
1 / 5
'लक्ष्मी निवास' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री तन्वी कोलतेनं 'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या सिझनमध्ये भाग घेतला आणि आपल्या दमदार खेळीने तिने हा सिझन जिंकला. राकेश बापट, विशाल कोटियन यांसारख्या तगड्या स्पर्धकांना मात देत तन्वीने ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. या विजयानंतर तन्वीचा चाहतावर्ग आणखीनच वाढला आहे.

2 / 5
तन्वी कोलते ही मूळची रत्नागिरीची असून ती अभिनेत्री, मॉडेल आणि इन्फ्लुएन्सर आहे. तिच्या बेधडक स्वभावामुळे आणि आत्मविश्वासाने खेळल्यामुळे ती चर्चेत आली. म्हणूनच तिला 'धाकड गर्ल' असं नाव ठेवण्यात आलं. तन्वीचा जन्म 7 फेब्रुवारी 1998 रोजी झाला असून ती 28 वर्षांची आहे. कमी वयात तिने मराठी कलाविश्वात चांगलं नाव कमावलं आहे.

3 / 5
तन्वीचं शालेय शिक्षण रत्नागिरीत झालं, तर पुढील शिक्षणासाठी ती पुण्याला गेली. तिथे तिने सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्समधून बी.टेकची पदवी प्राप्त केली. इंजीनिअरिंग क्षेत्रात शिक्षण घेऊनही तन्वीची आवड मात्र अभिनय आणि मॉडेलिंगमध्ये होती.

4 / 5
टेलिव्हिजन इंडस्ट्रीत पदार्पण करण्यापूर्वी तिने विविध सौंदर्यस्पर्धांमध्ये भाग घेतला होता. 'मिस रत्नागिरी 2018', 'मिस गोवा 2020' हे किताब तिने पटकावले आहेत. त्यानंतर 'लक्ष्मी निवास' या मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली. तन्वीने विविध मराठी म्युझिक व्हिडीओंमध्येही काम केलं आहे.

5 / 5
'बिग बॉस मराठी 6' जिंकल्यानंतर तिला बक्षीस म्हणून 15 लाख रुपयांचा धनादेश आणि 10 लाख रुपयांचं डायमंड ज्वेलरीचं वाऊचर मिळालं. यानंतर तन्वीच्या संपत्तीत आणखी वाढ झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तन्वीची एकूण संपत्ती 58 ते 80 लाख रुपयांदरम्यान आहे. मालिका आणि जाहिरातींमधून ती बराच पैसा कमावते.

Follow Us