
बिर्याणीचं नाव जरी काढलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. समोर बिर्याणी पाहून कधी एकदा चव चाखू असं अनेकांना वाटतं. बिर्याणी चविष्ट आणि स्वादिष्ट व्हावी यासाठी अनेकजण वेगवेगळ्या मसाल्यांचा उपयोग करतात.

पण याच बिर्याणीवरून अनेकदा वेगवेगळे दावे केले जातात. मांसाहार करणारे व्हेज बिर्याणी असा कोणताही खाद्यपदार्थ नसतो. व्हेज बिर्याणी नव्हे तर तो व्हेज पुलाव असतो, असे सांगतात. तर शाकाहीर लोक बिर्याणी ही व्हेज आणि नॉनव्हेज असते, असे सांगतात.

पण हा वाद थोडा बाजूला ठेवला तर बिर्याणीसाठी वापरला जाणारा मसाला हा व्हेज असतो की नॉन व्हेज? हा प्रश्न कधी तुम्हाला पडला आहे का? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न तुम्ही कधी केला आहे का?

बिर्याणीचा मसाला तयार करताना वेगवेगळ्या गोष्टी वापरल्या जातात. यात खडा मसाला, धने, मिरे, लवंग, दालचिनी, इलायची, जायफळ, कडिपत्ता, जीरे यांचा तसेच अन्य घटकांचा समावेश असतो. या सर्व घटकांची पूड करून मसाला तयार होतो.

बिर्याणीमध्ये वापरला जाणारा मसाला हा सर्व व्हेज घटकांपासून तयार केला जातो. त्यामुळेच बिर्याणीचा मसालादेखील व्हेज असतो. तुम्ही शाकाहारी असाल तरीदेखील बिर्याणी मसाल्याचा वापर करू शकता.