Pankaja Munde : पंकजा मुंडे यांची शिवशक्ती परिक्रमा, मंदिरात गुरू शुक्राचार्यांचे घेतले दर्शन
श्रीक्षेत्र बेट कोपरगाव येथे सदगुरू शुक्राचार्य महाराज मंदिरात जाऊन गुरू शुक्राचार्यांचे दर्शन घेतले. मंदिर समिती आणि ग्रामस्थांच्या वतीने उत्स्फूर्त स्वागत झाले. शिवशक्ती परिक्रमेदरम्यान पंकजा मुंडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांच्या समस्या समजून घेतल्या.

- अहमदनगर : श्रीक्षेत्र बेट कोपरगाव येथे सदगुरू शुक्राचार्य महाराज मंदिरात जाऊन गुरू शुक्राचार्यांचे दर्शन घेतले. मंदिर समिती आणि ग्रामस्थांच्या वतीने उत्स्फूर्त स्वागत झाले.
- भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या दोन महिने राजकारणापासून अलिप्त होत्या. आता त्यांनी शिव-शक्ती परिक्रमा सुरू केली. सध्या राजकारणावर बोलणार नसल्याचं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.
- शिवशक्ती परिक्रमेदरम्यान पंकजा मुंडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांच्या समस्या समजून घेतल्या. मदत करण्याचे आश्वासन दिले.
- पंकजा मुंडे म्हणाल्या, दसरा मेळाव्यात लाखो लोकं येतात. माझं चुकलं तर मी लोकांना हात जोडून माफी मागते. लाखो लोकं येतात. या कार्यक्रमाचं मिशन नाही. कमिशन नाही. बदल्या करायला हाती काही नाही. तरीही लोकं येतात. कारण लोकांचं माझ्यावर प्रेम आहे.
- काचावर चालणाऱ्यांची कदर होते. राजकारण हे व्रत आहे. माझ्या वाट्याला संघर्ष आला आहे. या संघर्षासाठी आशीर्वाद मिळावे म्हणून ही मुंडे परिक्रमा असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हंटलं.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us