
अभिनेता बॉबी देओलने ‘आश्रम’ वेब सीरीजमधून प्रेक्षकांचे जबरदस्त मनोरंजन केले.

6 ऑक्टोबर 1995 रोजी बॉबी देओलचा पहिला चित्रपट ‘बरसात’ प्रदर्शित झाला होता.

अभिनेत्री ट्विंकल खन्नाने देखील ‘बरसात’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

आज बॉबी देओलच्या चित्रपट कारकिर्दीची 25 वर्षे पूर्ण झाली आहे.

या 25 वर्षात खूप उतार-चढाव आले. परंतु, कधीच हार मानू नये हे मला या 25 वर्षांनी शिकवले, असे म्हणत त्याने प्रेकक्षकांचे आभार मानले आहेत.

पुढच्या 25 वर्षांसाठी मी आतपासून उत्सुक असल्याचे त्याने ट्विट करत म्हटले आहे.

नुकतेच प्रदर्शित झालेल्या ‘क्लास ऑफ 83’ आणि ‘आश्रम’ या वेब सिरीजना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला.

मधल्या काळात बॉलिवूडपासून दूर गेलेल्या बॉबीने सलमानच्या ‘रेस 3’मधून पुनरागमन केले.

‘हाऊसफुल 4’मधील त्याची भूमिका गाजली होती.