Abhay Deol : अभय देओल करतो ते एकदम हटकेच, जंगलात बांधला ‘शीश महल’, गोव्यातील या प्रॉपर्टीचे फोटोज पाहून त्या मागचा विचार, कन्स्पेट तुम्हाला आवडेल
Abhay Deol : दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांचा पुतण्या अभय देओलने फार कमी चित्रपटात काम केलय. पण जे चित्रपट केलेत, ते प्रेक्षकांच्या लक्षात राहतील असे आहेत. व्यक्तिगत आयुष्यातही त्याचं काम तसचं असतं. त्याने जंगलात एक शीश महल बांधलाय. त्या मागचा त्याचा विचार, कन्सेप्ट तुम्हालाही आवडेल.

स्वप्न पहायची असतील तर मोठी पहा, नाहीतर पाहूच नका. देओल कुटुंबाचा वारस अभय देओलची लॅविश लाइफ पाहून तुम्ही हेच म्हणालं, आयुष्य असावं तर असं. गोव्यामध्ये अभय देओलचं शानदार घर आहे. त्याचं हे ग्लास हाऊस लग्ररी रिसॉर्ट किंवा स्वप्नाच्या महालापेक्षा कमी नाहीय. अभिनेत्याने जंगलात हे घर मेहनतीने बनवलं आहे.
घरातील काचेच्या भिंतींपासून प्रायवेट स्विमिंग पूल पर्यंत सर्व श्वास रोखून धरायला लावणारं आहे. अभय देओलची ही लॅविश प्रॉपर्टी गोव्याच्या असगांव भागात आहे. त्यांचं हे गोवा हाऊस निसर्गाच्या कुशीत वसलेलं आहे. चहूबाजूला हिरवळ आणि झाडांनी घेरलेलं हे घर मुंबईच्या धकाधकीच्या जीवनापासून लांब आहे.
या घराचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे काचेच्या भिंती. हा लग्जरी विला बाहेरुन बघा किंवा आतून. तुम्हाला लॅविशचं वाटेल. घराच्या आत असतानाही बाहेरचं सर्व पहायला मिळावं अशी अभयची इच्छा होती. त्याला बाहेरच पर्यावरण आत आणायचं होतं. अभयने आर्किटेक्टला सांगितलं की, त्याला खिडक्या नको तर काचेचे दरवाजे हवे आहेत.
स्लाइडचा दरवाजा उघडल्यावर बाहेर ग्रीनरची झलक मिळावी. लिविंग रुमच्या बाहेर झाडं, झुडूपं दिसावीत. जणू निसर्गाच्या मध्ये बसलोय असा फिल यावा. लिविंग एरिया खूप मोठा आणि ओपन आहे. हाय सीलिंग घरात आणखी सुंदर बनवते. डोळ्यांना अति वाटावं असं डेकोरेशन नाही केलय. इंटीरियर मिनिमल ठेवलं आहे.
कमी फर्नीचर, साधेपणा आणि नैसर्गिक गोष्टींचा वापर करुन क्लासी लूक दिलाय. घराच्या आत ब्लॅक ग्रॅनाइट फ्लोरिंग आणि डार्क वुडने काम केलय. या काचा होम अर्थी आणि नॅचुरल वाइब देतात. घराच्या बाहेर प्रायवेट स्वीमिंग पूल आहे. हरिवळीच्या मधोमध असलेला हा पूल सुट्टीवर असल्याची जाणीव करुन देतो.