Adhyayan Suman | थेट मनात यायचे हे भयानक विचार, अध्ययन सुमन याने सांगितली अखेर मनातील खदखद, 12 चित्रपट गेले हातून आणि
अध्ययन सुमन हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. अध्ययन सुमन याने अत्यंत वाईट एक काळ बाॅलिवूडमध्ये बघितला आहे. त्याची काहीच चुकी नसताना अध्ययन सुमन याच्याकडून एका मागून एक असे 12 चित्रपट काढून घेण्यात आले. यावर आता अध्ययन सुमन याने भाष्य केले आहे.

अध्ययन सुमन हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. अध्ययन सुमन हा ओटीटीवर आपले नशीब आजमावत आहे. अध्ययन सुमन याने धमाकेदार पध्दतीने नक्कीच पुनरागमन केले आहे.

अध्ययन सुमन याने नुकताच एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये अध्ययन सुमन याने काही धक्कादायक खुलासे केले आहेत. अध्ययन सुमन याचे बोलणे ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसलाय.

अध्ययन सुमन याने म्हटले की, ज्यावेळी अचानक माझ्याकडून एका मागून एक असे 12 चित्रपट काढून घेतले त्यावेळी मला काय करावे हे अजिबात सुचत नव्हते.

मी बेडवर झोपून सतत फॅनकडे बघत असत. माझ्या मनात सतत आत्महत्या करण्याचा विचार येत होता. मात्र, हे माझ्या मित्रांनी आणि कुटुंबियांनी करू दिले नाही, ते माझ्यासोबत होते.

माझ्या वाईट काळात मित्रांनी आणि कुटुंबियांनी माझा खूप जास्त सपोर्ट नक्कीच केलाय. दररोज माझ्या मनात फक्त आणि फक्त आत्महत्येचेच विचार यायचे. कारण त्यावेळी जे काही घडत होते ते फार जास्त भयंकर होते.