
कधी काळी परस्परांच्या प्रेमात बुडालेले अर्जून कपूर आणि मलायका अरोडा आता वेगळे झालेत. त्यांच्या नात्याचा द एन्ड अनेक लोकांसाठी धक्कादायक होता.

ब्रेकअप नंतर दोघांनी अनेक उपरोधिक पोस्ट शेअर केल्या. अर्जुन कपूरने जेव्हा मलायकासोबत ब्रेकअप कंफर्म केलं, तेव्हापासून मलायका पोस्टच्या माध्यमातून आपल्या मनाची स्थिती सांगत आहे.

नुकतीच मलायक एक मिस्ट्री मॅनसोबत हसताना आनंदात दिसली. मिस्ट्री मॅनच्या हातात तिचा हात होता. यावेळी मलायका खूप खुश दिसत होती.

यानंतर अर्जुनने एक पोस्ट केली. त्यात त्याने दुसऱ्यांच्या आनंदात आपण आनंदी झालं पाहिजे असं म्हटलय. दुसऱ्यांच्या आनंदात आनंद शोधा, कारण तुम्ही त्यांच्यावर जास्त प्रेम करता असं अर्जुन कपूरने त्याच्या इन्स्टा स्टोरीमध्ये म्हटलय.

अर्जुनची ही स्टोरी पाहिल्यानंतर काही युजर्सच असं मत आहे की, त्याने ही स्टोरी एक्स गर्लफ्रेंड मलायकासाठी पोस्ट केलीय. कारण मिस्ट्री मॅनसोबत ती खूप आनंदात दिसत होती.