
सलमान खान एक असा अभिनेता आहे, ज्याने बॉडी बिल्डिंगला खूप प्रमोट केलय. त्याने सुरुवातीपासून आपल्या फिटनेसची खूप काळजी घेतली आहे. सलमानपासून प्रेरणा घेऊन अनेकांनी बॉडी बनवली.

ज्या अभिनेत्याची चर्चा होत आहे, ते आहेत शरत सक्सेना. त्यांनी 17 ऑगस्टला आपला 75 वा वाढदिवस साजरा केला. भले त्यांनी वयाच्या 75 मध्ये पदार्पण केलं असेल, पण त्यांनी आपली बॉडी अशी बनवलीय की, कोणी म्हणणार नाही, की हे 75 वर्षांचे आहेत.

शरत सक्सेना इन्स्टाग्रामवर आपले फोटो शेअर करत असतात. त्यांचा फिटनेस पाहून लोक दंग होतात. 75 व्या वाढदिवसाला त्यांनी सेलिब्रेशनच्यावेळचा एक फोटो शेअर केला.

फोटो शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं की, '75 व्या वर्षी सुद्धा मी काम करतोय. अजूनही हसत दमदारपणे पुढे जातोय'

बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांमध्ये शरत सक्सेना यांचा समावेश होतो. त्यांनी 1977 साली आलेल्या 'एजेंट विनोद' मधून आपल्या करिअरची सुरुवात केलेली. मागच्या 48 वर्षांपासून ते लोकांच मनोरंजन करतायत.