
बॉलिवूड अभिनेता गोविंदा हा कायमच चर्चेत असतो. गोविंदाची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून गोविंदा मोठ्या पडद्यापासून दूर आहे.

अनेक हीट चित्रपटे बॉलिवूडला देऊनही एकाही मोठ्या चित्रपटात सध्या गोविंदा काम करताना दिसत नाही. मात्र, इतकी वर्ष चित्रपटांपासून दूर असूनही गोविंदा लग्झरी लाईफ कशी जगतो असा प्रश्न अनेकांना पडतो.

फक्त अभिनयच नाहीतर गोविंदाचे इतरही बरेच व्यवसाय आहेत. मुंबईमध्ये गोविंदाचे तब्बल तीन घर आहेत. रायगडला त्याचे मोठे फॉर्म हाऊस देखील आहे.

यासोबतच शोमध्ये सहभागी होत आणि काही कंपनींच्या जाहिरातीमधूनही तो पैसा कमावते. अनेक ठिकाणी गोविंदाची हॉटेल देखील आहेत.

गोविंदा हा तब्बल 160 कोटी संपत्तीचा मालक आहे. काही दिवसांपूर्वीच गोविंदाच्या भाचीचे लग्न झाले. त्यावेळीही गोविंदाने भाची आरतीला महागडे गिफ्ट दिले होते.