कधीकाळी खिशात 1 रुपया नसणारा हा अभिनेता आज 300 कोटींचा मालक, 25 कोटींचं फार्महाऊस आणि अलिशान कार
बॉलिवूड इंडस्ट्रीमधील या अभिनेत्याकडे एकेकाळी जेवणासाठी नव्हते पैसे. पण आज त्याच्याकडे 25 कोटींचं अलिशान फार्महाऊस, 15 कोटींचं घर आणि अनेक अलिशान गाड्या. एकूण संपत्ती 300 कोटी रुपये.

मनोरंजन विश्वात अनेक कलाकार असे आहेत ज्यांनी प्रचंड संघर्षातून वाट काढत यशाच्या शिखरावर झेप घेतली आहे. मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून दाखवल्या आहेत.

कधी दोन वेळच्या जेवणासाठीही पैसे नसलेला हा कलाकार आज आलिशान जीवनशैली जगतो आणि सुमारे 300 कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक बनला आहे. त्यांचा प्रवास लाखो लोकांसाठी प्रेरणादायी ठरतो.

आज कपिल शर्मा आपल्या लोकप्रिय कॉमेडी शो ‘The Great Indian Kapil Show’मधून प्रेक्षकांचे मन जिंकत आहे. अफलातून कॉमिक टायमिंग, सहज संवादशैली आणि साधेपणामुळे कपिलने घराघरात आपली ओळख निर्माण केली.

टीव्ही, चित्रपट आणि स्टेज शोमधून मिळालेल्या यशामुळे आज त्यांच्याकडे आलिशान घरे, महागड्या गाड्या आणि कोट्यवधींची मालमत्ता आहे. पंजाबमध्ये असलेलं त्याचं फार्महाऊस ही त्याची सर्वात खास प्रॉपर्टी मानली जाते. रिपोर्ट्सनुसार या फार्महाऊसची किंमत 25 कोटी रुपयांहून अधिक आहे.

लक्झरी लाइफस्टाइलचा भाग म्हणून कपिल शर्माची वॅनिटी व्हॅनही इंडस्ट्रीतील सर्वात महागड्या व आलिशान व्हॅनपैकी एक मानली जाते. रिपोर्ट्सनुसार या वॅनिटी व्हॅनची किंमत सुमारे 5.5 कोटी रुपये आहे. त्यासोबतच तो लक्झरी कार्सचाही मोठा शौक आहे. त्याच्याकडे अनेक महागड्या कार आहेत.

जर कपिल शर्माच्या एकूण संपत्तीचा विचार केला तर रिपोर्ट्सनुसार त्याची नेटवर्थ सुमारे 280 कोटी रुपये आहे. ‘The Great Indian Kapil Show’साठी तो एका एपिसोडचे सुमारे 5 कोटी रुपये मानधन घेतो.