अनेक रिजेक्शननंतर मिळाला पहिला चित्रपट, 20 कोटी बजेटमध्ये केली 300 कोटींची कमाई, वादग्रस्त ठरूनही ठरला ब्लॉकबस्टर
बॉलिवूड इंडस्ट्रीमधील 34 वर्षीय अभिनेत्री जिच्या 138 मिनिटांच्या चित्रपटाने 20 कोटींच्या बजेटमध्ये केली होती 300 कोटींची कमाई. कोण आहे ही अभिनेत्री?

मनोरंजन इंडस्ट्रीमध्ये स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक नाव म्हणजे अदा शर्मा. करिअरच्या सुरुवातीच्या काळात अनेक रिजेक्शनचा सामना करूनही तिने हार मानली नाही. तिने स्वतःच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली. आज अदा शर्मा तिचा 34 वा वाढदिवस साजरा करत आहे.

1992 साली जन्मलेल्या अदा शर्माने आज बॉलिवूडसह साऊथ इंडस्ट्रीतही स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मात्र, तिचा हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी तिने अनेक ऑडिशन्स दिल्या, पण सुरुवातीच्या काळात तिला वारंवार रिजेक्शनचा सामना करावा लागला.

अखेर 2008 साली तिच्या आयुष्यात मोठा टर्निंग पॉइंट आला. दिग्दर्शक विक्रम भट्ट यांच्या 1920 या हॉरर चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. पहिल्याच चित्रपटातून तिच्या अभिनयाची चर्चा सुरू झाली. या चित्रपटानंतर अदा शर्माने मागे वळून पाहिलं नाही.

अदा शर्माच्या करिअरमध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेला चित्रपट म्हणजे The Kerala Story. 2023 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाभोवती मोठा वाद निर्माण झाला होता. चित्रपटाच्या कथानकावरून राजकीय आणि सामाजिक स्तरावर अनेक चर्चा झाल्या. मात्र, या वादाचा चित्रपटाच्या कमाईवर कोणताही परिणाम झाला नाही.

सुमारे 20 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या ‘द केरळ स्टोरी’ने बॉक्स ऑफिसवर तब्बल 300 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली. म्हणजेच या चित्रपटाने आपल्या बजेटच्या जवळपास 15 पट कमाई करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. जवळपास 138 मिनिटांच्या या चित्रपटाने थिएटरमध्ये जबरदस्त धुमाकूळ घातला होता.