
अभिनेत्री अनन्या पांडे तिच्या नवनवीन फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते.

नुकताच अनन्याने एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या फोटोमध्ये अनन्याची 'गर्ल गँग' अर्थात किंग खानची लेक सुहाना खान, बिग बींची नात नव्या नंदा आणि संजय कपूरची लेक शनाया कपूर दिसत आहेत.

या सोबतच 'खरंच काहीच बदललं नाहीय', असं म्हणत तिने त्यांच्या चौघींचा बालपणीचा फोटो देखील शेअर केला आहे.

नुकतीच अनन्या मालदीव ट्रीपवरून परतली असून, सध्या कुटुंबासोबत मुंबईत फिरण्याचा आनंद लुटत आहे.

या दरम्यानचे काही हटके फोटो देखील अनन्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.