
बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांना लीड रोल मिळाला नाही. पण काका, काकू, मामा-मामी, आत्या अशा भूमिका करुन त्यांनी प्रेक्षकांवर आपली छाप उमटवली. अशाच अभिनेत्रींपैकी एक आहेत, हिमानी शिवपुरी. त्यांनी आपल्या करिअरमध्ये शाहरुख खान आणि सलमान खानसोबत अनेक सुपरहिट चित्रपटात काम केलं.

हिमानी शिवपुरी आपला 65 वा वाढदिवस साजरा करतायत. त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाचं शिक्षण घेतलं. त्यानंतर फारुक शेखच्या अब आएगा मजामधून बॉलिवूड करिअरची सुरुवात केली. 90 च्या दशकात बऱ्याच चित्रपटात हिमानी शिवपुरी दिसायच्या. घरा-घरातील तो लोकप्रिय चेहरा होता.

त्यांची खास बाब ही की, त्यांनी कमर्शिअल सिनेमासोबत आर्ट फिल्ममधूनही अभिनय केला. टीव्ही क्षेत्रात त्यांनी चांगलं नाव कमावलं. मम्मो, सूरज का सातवां घोड़ा, हम आपके हैं कौन, यार गद्दार, त्रिमुर्ती, वीरगती, बंदिश, प्रेम ग्रंथ, परदेस, कोएला आणि बंधन सारख्या चित्रपटात काम केलं.

बेशर्म, किस्मत कनेक्शन, मिलेंगे मिलेंगे, बिन्नी अँड फॅमिली, करतूत आणि अम्मा की बोली सारख्या चित्रपटात काम केलं. वर्ष 2024 मध्ये त्या शेवटच्या चित्रपटात दिसलेल्या. त्यानंतर त्या कुठल्या चित्रपटात दिसलेल्या नाहीत. टीव्ही विश्वातही त्या दीर्घकाळापासून सक्रीय होत्या.

त्यांनी संजोग से बनी संगिनी, गुदगुदी, घर एक सपना, बात हमारी पक्की है, ससुराल सिमर का, डोली अरमानों की, एक विवाह ऐसा भी, होम, अस्तित्व, हप्पू की उल्टन पल्टन आणि मिसेज कौशिक की पांच बहुएं सारख्या सीरियलमध्ये काम करुन नाव कमावलं.