
जान्हवी कपूर ही तिच्या आगामी चित्रपटामुळे सध्या चांगलीच चर्चेत आहे. नुकताच दिलेल्या मुलाखतीमध्ये काही मोठे खुलासे करताना जान्हवी कपूर ही दिसलीये.

नुकताच जान्हवी कपूरने काही मोठ्या प्रश्नांची थेट उत्तरे देखील दिली आहेत. जान्हवी कपूरला विचारण्यात आले की, कधी सार्वजनिक ठिकाणी बॉयफ्रेंडसोबत रोमान्स केला आहे का?

यावर उत्तर देणे टाळत जान्हवीने म्हटले की, डोक्याचे दही नका करू. जान्हवी म्हणाली, डिज्नी स्टोरीहून तिने च्युइंग गमसारखे काहीतरी चोरले.

हेच नाहीतर हॉटेलमधून तिने तकिये देखील चोरते. खासगी आयुष्याबद्दल बोलताना जान्हवी म्हणाली की, ती कधीच अंघोळ केल्याशिवाय घराच्या बाहेर पडत नाही, कधी कधी दोन वेळाही ती अंघोळ करते.

काही दिवसांपूर्वी जान्हवी कपूर ही वडिल बोनी कपूर यांच्यासोबत कपिल शर्माच्या शोमध्ये देखील सहभागी झाली होती.