
भविष्यात काय होईल याची कोणालाही माहिती नसते. कदाचित यामुळेच बॉलिवूड कलाकार अनेक चित्रपटांना नकार देतात, पण हेच चित्रपट पुढे खूप सुपरहिट ठरतात. 90च्या दशकांत आणि 2000च्या दशकाच्या सुरुवातीस प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री काजोलनेही (Kajol) याचा अनुभव घेतला आहे. 'बाजीगर', 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे', 'कभी खुशी कभी गम', 'फना' आणि 'माय नेम इज खान' अशा सुपरहिट चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे.पण तिने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांना नकारही दिला होता. काजोलने असे काही चित्रपट नाकारले जे सुपरहिट तर ठरलेच, पण त्यांनी अनेक अभिनेत्रींच्या करिअरला झळाळी मिळाली.

दिल तो पागल है : यश चोप्रा यांना या चित्रपटात काजोलची कास्ट करण्याची इच्छा होती, पण तसे झाले नाही आणि तिच्या जागी करिश्मा कपूर कास्ट झाली. काजोलने शाहरुख खान अभिनीत या चित्रपट भूमिका नाकारली, कारण माधुरी दीक्षितनंतर तिला दुसरी लीड भूमिका करण्याची इच्छा नव्हती. तिला वाटले की, आपली भूमिका सशक्त नाही.

दिल से : मणिरत्नम यांना चित्रपटांचे जादूगार मानले जाते. परंतु, असे असूनही काजोलने हा चित्रपट नाकारला. बातमीनुसार तारखा उपलब्ध नसल्यामुळे तिने या चित्रपटाला नकार दिला होता. नंतर हा चित्रपट मनीषा कोईरालाकडे गेला आणि तिने तिच्या अभिनयाने सर्वांचे मन जिंकले.

गदर : अभिनेता सनी देओल स्टारर हा चित्रपट कोण विसरु शकेल? उत्तम कथा, स्टारकास्ट, संगीताने सजलेल्या या चित्रपटाची ऑफर सुरुवातीला काजोलला देण्यात आली होती. पण, आपण ही भूमिका साकारू शकणार नाही, असे म्हणत काजोलने हा चित्रपट नाकारला होता. नंतर ही भूमिका अमीषा पटेल हिच्याकडे गेली आणि तिला बरीच प्रशंसा मिळाली.

वीर-झारा : या सुंदर लव्ह स्टोरीमध्ये भारतीय हवाई दलाच्या पायलट आणि पाकिस्तानी मुलीची कहाणी दर्शवली गेली होती. दिग्दर्शक यश चोप्राला यातही शाहरुख खान आणि काजोलच्या केमिस्ट्रीचे भांडवल करायचे होते, पण यावेळीही काजोलने नकार दिला. नंतर ही भूमिका प्रीती झिंटाकडे गेली.

कभी अलविदा ना कहना : करण जौहर आणि काजोलची ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन केमिस्ट्री उत्कृष्ट मानली जाते. नैनाच्या भूमिकेसाठी करणची पहिली पसंती काजोल होती, पण काजोलकडून या भूमिकेला नकार मिळाला. कुठे याचे कारण चित्रपटाचा विषय, तर कुठे तारखा सांगितल्या गेल्या. नंतर ही भूमिका राणी मुखर्जीने साकारली, यासाठी तिचे खूप कौतुक झाले.

3 इडियट्स : आमिर खान, आर माधवन आणि शरमन जोशी यांच्या या चित्रपटाला जगभरात पसंती मिळाली आणि त्याने नवीन विक्रम स्थापित केले. या चित्रपटासाठी काजोलशीही संपर्क साधण्यात आला होता, पण ती तिने नकार दिला, कारण तिला भूमिका आवडली नव्हती. मग ही भूमिका करीना कपूर खानकडे गेली.