
काजोल हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत. एक मोठा काळ काजोल हिने बाॅलिवूडमध्ये गाजवलाय.

एका मुलाखतीमध्ये काजोल हिने मोठा खुलासा केला. काजोल हिने थेट सांगितले की, एका चित्रपटाची तिला आॅफर होती. मात्र, त्या चित्रपटात आमिर खान असल्याने आपण चित्रपटाला नकार दिला.

आमिर खान याच्यासोबतच्या चित्रपटाला नकार देण्याचे कारणही काजोल हिने सांगितले. काजोल म्हणाली की, आमिर खान हा चित्रपट हिट करण्यासाठी काहीही करू शकतो.

फक्त याच कारणामुळे काजोल हिने आमिर खान याच्या चित्रपटात काम करण्यास नकार दिला. काजोल हिने नकार दिल्यानंतर आमिर खान याच्यासोबत ट्विंकल खन्ना मुख्य भूमिकेत दिसली.

धक्कादायक म्हणजे काजोल हिने नकार दिलेला ट्विंकल खन्ना आणि आमिर खान यांचा मेला हा चित्रपट फ्लाॅप गेला. या चित्रपटाला काहीच धमाका करता आला नाही.