काजोलच्या दिलखेच अदा, पण कॅप्शनने वेधल्या सर्वांच्या नजरा, फोटो पाहून म्हणाल…
अभिनेत्री काजोल हिला आज कोणत्या ओळखीची गरज नाही. अभिनेत्री आता बॉलिवूडपासून दूर असली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. पण आता काजोल फक्त तिच्या पोस्टमुळेच नाही तर, कॅप्शनमुळे देखील चर्चेत असते.

बॉलिवूडची प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री काजोल हिच्याबद्दल आज काहीही वेगळं सांगण्याची गरज नाही. अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.
आता देखील अभिनेत्री तिच्या नव्या पोस्टमुळे चर्चेत आली आहे. काजोल हिने स्वतःचेच काही फोटो पोस्ट केले आहे. फोटो पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये, 'मी निर्माण करत असलेल्या प्रत्येक डोकेदुखीसाठी मी पात्र आहे.'
अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत अभिनेत्री काजोल हिने चाहत्यांच्या मनावर आणि बॉलिवूडवर राज्य केलं. आता काजोल मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.
फक्त सोशल मीडियावर नाही तर, सातासमुद्रापार देखील काजोल हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
चाहते देखील अभिनेत्रीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात. वयाच्या 51 व्या वर्षी देखील काजोल प्रचंड क्लासी आणि रॉयल दिसते. तिचा लूक देखील चाहते फॉलो करतात.