
अभिनेत्री कजोल हिची क्रेझ आजही चाहत्यांमध्ये दिसून येते. वयाच्या 51 व्या वर्षी देखील काजोल हिच्या लोकप्रियतेत घट झालेली नाही. काजोल कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतं.

काजोल हिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा नवीन लूक आवडलेला आहे. फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने लक्षवेधी कॅप्शन देखील लिहिलं आहे. सध्या सर्वत्र काजोल हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

काजोल हिने पांढऱ्या रंगाच्या ड्रेममध्ये काही फोटो पोस्ट केले आहेत. फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये, '2026 मध्ये मी अस्थिर होणार आहे... अरेरे.. मला आता थांबायचं नाही...' असं लिहिलं आहे. काजोल कायम सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते.

अभिनेत्री काजोल गेल्या काही दिवसांपासून तिच्या नव्या शोमुळे चर्चेत आहे. अभिनेत्रीच्या शोमध्ये आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे. तर काजोल देखील तिच्या मतांमुळे चर्चेत असते. शोचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

काजोल सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.