
24 वर्षांपूर्वी रिलीज झालेला माधुरी दीक्षितचा 'लज्जा' चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपर फ्लॉप ठरलेला. यात अजय देवगण, मनीषा कोइराला आणि अनिल कपूरसारखे स्टार्स होते. 20 कोटीमध्ये बनलेल्या या चित्रपटाने 15 कोटीची कमाई केलेली.

2007 साली आलेल्या 'आजा नचले' चित्रपटाची हालत लज्जापेक्षा पण वाईट होती. मेकर्सनी 18 वर्षांपूर्वी आलेला हा चित्रपट 25 कोटीच्या बजेटमध्ये बनवलेला. पण भारतात या चित्रपटाने फक्त 14.07 कोटींचीच कमाई केली.

14 वर्षांपूर्वी आलेला 'डेढ़ इश्किया' चित्रपट मेकर्सनी 37 कोटीच्या बजेटमध्ये बनवलेला. पण भारतात बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने 27.50 कोटी रुपयांची कमाई केली. 2014 साली बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट कोसळलेला.

'गुलाब गँग' आपल्या बजेटच्या अर्धापैसा पण वसूल करु शकली नव्हती. हा चित्रपट सुद्धा 2014 साली रिलीज झालेला. सौमिक सेनच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाच बजेट 29 कोटी रुपये होतं. या चित्रपटाने फक्त 14 कोटींची कमाई केली.

माधुरी दीक्षितने अक्षय कुमारसोबत एकच चित्रपट केला. पण तो चित्रपट प्रेक्षकांना फारसा पसंत पडला नाही. या चित्रपटाचं नाव 'आरजू' आहे. 26 वर्षांपूर्वी 1999 साली हा चित्रपट रिलीज झालेला. 8 कोटीमध्ये बनलेल्या या चित्रपटाची कमाई 6 कोटींपेक्षा पण कमी झालेली.