AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘गुंजाळ महाराज’ अट्टल रंगीला! १७ वर्षीय मुलीच्या मांडीवर पक्कडने चटके, पाच वर्षांपासून अत्याचार!

अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात एका कीर्तनकार आणि वारकरी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षावर अल्पवयीन मुलीवर पाच वर्षांपासून शारीरिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे.

'गुंजाळ महाराज' अट्टल रंगीला! १७ वर्षीय मुलीच्या मांडीवर पक्कडने चटके, पाच वर्षांपासून अत्याचार!
Gunjal MaharajImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Mar 16, 2026 | 6:04 PM
Share

ढवळपुरी येथील श्री दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ महाराज यांच्यावर १७ वर्षीय मुलीवर वारंवार बलात्कार केल्याचा आणि तिला धमक्या देऊन मौन बाळगायला भाग पाडल्याचा आरोप करण्यात आला आहे. पीडित मुलीच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध पोस्को कायद्यासह अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पारनेर पोलिसांनी रविवारी पहाटे त्याला अटक केली. न्यायालयाने आरोपीला २० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

अमानुष कृत्य

पीडित मुलगी ढवळपुरी गावातील इयत्ता आठवीत शिकत होती. आरोपीने तिला धाक दाखवत नववीच्या वर्गात असल्यापासून जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवल्याचा आरोप आहे. कुणाला सांगितल्यास कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिल्याने भीतीपोटी मुलीने पाच वर्षे ही घटना गुप्त ठेवली होती. १० मार्च रोजी गुंजाळ महाराजांनी फोन करून तिला घरी बोलावले. मुलीने नकार दिल्यावर संतापलेल्या आरोपीने तिला मारहाण केली. त्यानंतर स्वयंपाकघरातील लोखंडी पक्कड गॅसवर गरम करून तिच्या दोन्ही मांडींवर चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पूर्वीही दोन गुन्हे दाखल

धक्कादायक बाब म्हणजे यशवंत थोरात उर्फ गुंजाळ महाराज यांच्यावर यापूर्वीही अशाच स्वरूपाचे दोन गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी एका प्रकरणात तो निर्दोष मुक्त झाला असून, दुसऱ्या प्रकरणाचा खटला सध्या न्यायालयात सुरू आहे.

परिसरात संतापाची लाट

या घटनेने ढवळपुरीसह संपूर्ण पारनेर तालुक्यात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. एकीकडे धार्मिक कीर्तन आणि प्रवचन करणारा महाराज, दुसरीकडे अल्पवयीन मुलीवर असे क्रूर अत्याचार, यामुळे वारकरी संप्रदायाच्या प्रतिमेला मोठा धक्का बसल्याची भावना व्यक्त होत आहे. पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी केली असून, पोलिस उपनिरीक्षक रणजित मारग यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. पारनेर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, गुंजाळ महाराजांविरुद्ध आणखी कोणतीही तक्रार किंवा माहिती असल्यास तात्काळ पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा.

Follow Us
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...