AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! उद्धव ठाकरे या मुद्दयावर भाजपच्या पाठी, घेतली थेट भूमिका…, मोठं विधान

मोठी बातमी समोर येत आहे, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी  महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयकाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच त्यांनी यावेळी बोलताना भाजपला देखील टोला लगावला आहे.

मोठी बातमी! उद्धव ठाकरे या मुद्दयावर भाजपच्या पाठी, घेतली थेट भूमिका..., मोठं विधान
Uddhav ThackerayImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 16, 2026 | 5:59 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी  महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयकाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे.  धर्मांतराच्या बद्दलच जे विधेयक आहे, ते विधानसभेत मांडलं गेलं आहे. उद्या ते विधान परिषदेमध्ये मांडलं जाईल. त्या विधेयकाचा मसुदा मी पाहिला. धर्म स्वातंत्र्य हे प्रत्येकाला असलंच पाहिजे, कोणीही जोर जबरदस्तीने किंवा कोणच्या असाह्यतेचा फायदा घेऊन, आमिष दाखवून धर्मांतर करता कामा नये. जर असं होत असेल तर त्याला आमचा विरोध आहेच. म्हणून या धर्मांतर विरोधी विधेयकाला आमचा पाठिंबा आहे, असं यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे? 

धाकधपटशा दाखवणं, धमक्या देणं, त्यांच्यानंतर पैसे देतो सांगणं, असं करून कोणी जर धर्मांतर करत असेल तर त्याला आमचा विरोध आहे. मात्र यामध्ये काही प्रश्नांची उत्तर मिळणं गरजेचं आहे. या विधेयकामध्ये असं नमूद करण्यात आलं आहे की, गेल्या काही वर्षांमध्ये अशा प्रकारच्या धर्मांतरामध्ये वाढ झाली आहे. आता गेल्या काही वर्षांमध्ये राज्यात आणि देशामध्ये देखील भाजपचीच सत्ता आहे. मग हे सरकार असताना सुद्धा, बळजबरीने किंवा फसवून धर्मांतरामध्ये वाढ झाली असेल तर ते अपयश कोणाचं आहे? असं म्हणत यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपला टोला देखील लगावला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की,  दुसरा प्रश्न म्हणजे कोणत्या समजात? कोणत्या विभागात? कोणत्या प्रकारे धर्मांतर झालं? याचं जर उत्तर मिळालं तर आम्हाला सुद्धा सावध राहता येईल. आमचे कार्यकर्ते देखील तिकडे तत्पर राहातील.जर अशा पद्धतीने कोणाचं धर्मांतर होत असेल तर आम्ही देखील त्याला नक्की विरोध करू. आम्ही या बिलाला पाठिंबा देत आहोत, असं यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. दरम्यान गॅस टंचाईवरून देखील उद्धव ठाकरे यांनी सरकारला टोला लगावला आहे. जर सरकार म्हणतं की राज्यात गॅस टंचाई नाही, तर लोकांनी रागां का लावल्या आहेत, असा सवाल यावेळी उद्धव ठाकरे यांनी सरकारला केला आहे.

Follow Us
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान