माधुरीने या गाण्यासाठी 9 दिवस केलेला प्रचंड सराव, पाय थर-थर कापायचे, गाणं ठरलेलं ब्लॉकबस्टर

6 मिनिट 18 सेकंदाचं ब्लॉकबस्टर गाणं, ज्याने माधुरी दीक्षितची उडवलेली झोप. 9 दिवस माधुरीने या गाण्यासाठी केलेला प्रचंड सराव. थर-थर कापायचे पाय.

| Updated on: May 01, 2026 | 1:41 PM
1 / 5
आपल्या अभिनय, सौंदर्य, नजाकत आणि अप्रतिम नृत्यकौशल्याने अनेक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या माधुरी दीक्षितला ‘डान्सिंग क्वीन’ म्हणूनही ओळखले जाते. तिच्या कारकिर्दीत तिने अनेक सुपरहिट आणि आयकॉनिक गाण्यांवर डान्स केला आहे.

2 / 5
मात्र, एक गाणे असे होते ज्याने तिची झोप उडवली होती. हे गाणे म्हणजे 2000 साली प्रदर्शित झालेल्या 'पुकार' या चित्रपटातील ‘के सरा सरा’. या गाण्याने रिलीज झाल्यानंतर प्रचंड लोकप्रियता मिळवली आणि आजही ते आयकॉनिक गाणं मानले जाते. पण या गाण्याच्या शूटिंगपूर्वी माधुरी खूपच तणावाखाली होती.

3 / 5
यामागचे कारण म्हणजे या गाण्यात तिला ‘डान्सिंग गॉड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रभू देवासोबत नृत्य करायचे होते. प्रभुदेवासोबत स्क्रीन शेअर करताना आणि त्याच्याइतक्या उच्च दर्जाच्या नृत्याला न्याय देण्याच्या विचाराने माधुरी खूपच नाराज झाली होती.

4 / 5
चित्रपटाचे निर्माते बोनी कपूर यांनी एका कार्यक्रमात सांगितले होते की, या गाण्यासाठी माधुरीने तब्बल 9 दिवस कठोर सराव केला होता. तरीदेखील शूटिंगच्या वेळी ती इतकी घाबरली होती की तिचे पाय थरथरत होते. मात्र, तिच्या मेहनतीचा परिणाम असा झाला की आजही या गाण्याची कोरिओग्राफी सर्वोत्कृष्ट मानली जाते.

5 / 5
‘के सरा सरा’ हे गाणे  माधुरी दीक्षितच्या कारकिर्दीतील एक मैलाचा दगड मानले जाते आणि तिच्या मेहनतीचे व समर्पणाचे उत्तम उदाहरण ठरते.

Follow Us