Malaika Arora : तरुण दिसणं कधी थांबवशील…, मलायकाच्या ग्लॅमसर फोटोंवर नेटकऱ्यांची प्रतिक्रिया, तिच्यासाठी वय फक्त आकडा
Malaika Arora : अभिनेत्री मलायका अरोरा हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आता देखील तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, मलायकाच्या ग्लॅमसर फोटोंवर कमेंट करत नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अभिनेत्री मलायका अरोरा कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. आता देखील मलायका हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. पांढऱ्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीने फोटोशूट करत फोटो पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मलायकाच्या फोटोशूटची चर्चा रंगली आहे.
चाहत्यांना देखील अभिनेत्रीच्या अदा प्रचंड आवडल्या आहेत. सध्या सर्वत्र मलायका हिचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहे. हटके लूकमध्ये मलायका सर्वांना फॅशन गोल्स देत आहे.
क्लासी आणि ग्लॅमरस फोटो पोस्ट करत मलायका हिने लक्षवेधी कॅप्शन दिलं आहे. An all- white kinda affair असं कॅप्शन अभिनेत्रीने लिहिलं आहे. ज्यावर नेटकऱ्यांनी कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत.
अनेकांना मलायकाच्या सौंदर्याचं कौतुक केलं. तर अनेकांनी अभिनेत्रीला ट्रोल देखील केलं. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'तरुण दिसणं कधी थांबवशील', दुसरा नेटकरी म्हणाला, 'क्या बात है मलायका चाची..'
मलायका कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.