उद्धव ठाकरेंना मोठा झटका? शिंदेंच्या वकिलाने शोधली ती चूक, फासे पलटणार? सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुरू असलेल्या सुनावणीत शिंदेंच्या वकिलांनी ठाकरे गटाच्या युक्तिवादातील मोठी चूक उघड केली आहे. बाळासाहेब पाटील प्रकरणाचा चुकीचा अर्थ लावल्याचे त्यांनी सांगितले. या युक्तिवादामुळे उद्धव ठाकरेंना मोठा राजकीय व कायदेशीर झटका बसण्याची शक्यता आहे, कारण यामुळे फासे पलटण्याची चिन्हे आहेत.

शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आज पुन्हा एकदा शिंदे गटाचे वकील ध्रुव मेहता हे युक्तिवाद करत आहेत. ध्रुव मेहता यांनी आज जोरदार युक्तिवाद केला आहे. यावेळी त्यांनी ठाकरे गटाच्या वकिलाने केलेल्या युक्तिवादातील मोठी चूक शोधली आहे. ही चूक कोर्टाने ग्राह्य धरल्यास उद्धव ठाकरे यांना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. ध्रुव मेहता यांनी थेटपणे बाळासाहेब पाटील प्रकरणावरच बोट ठेवून ठाकरे गटाच्या युक्तिवादातील हवा काढली आहे. त्यामुळे कोर्ट आता काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.
एकनाथ शिंदे यांचे वकील ध्रुव मेहता यांनी बाळासाहेब पाटील प्रकरणावर भाष्य केलं आहे. या प्रकरणात बाळासाहेब पाटील प्रकरणाचा दाखला दिला जात आहे. ठाकरेंच्या वकिलाकडून त्यावरच युक्तिवाद केला आहे. पण बाळासाहेब पाटील प्रकरणाचं जजमेंट या केसमध्ये मिसलिड करणारं आहे. विरोधकांचा युक्तिवाद सुप्रीम कोर्टाच्या बाळासाहेब पाटील प्रकरणातील निकालावर आधारित आहे. मात्र, त्यांच्याकडून त्या निकालाचा चुकीचा अर्थ लावला जात आहे, असा युक्तिवाद ध्रुव मेहता यांनी केला आहे. ज्या ठाकरे गटाचा युक्तिवाद बाळासाहेब पाटील प्रकऱणावर आधारीत होता, त्या केसचा दाखलाच कसा या प्रकरणात मिसलिड करणारा आहे, हे ध्रुव मेहता यांनी दाखवून दिलं आहे. त्यामुळे ठाकरेंना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे.
कर्नाटकाचा दाखला
ध्रुव मेहता यांनी यावेळी कर्नाटकात 2019मध्ये सरकार कसं स्थापन झाला याचा दाखलाही दिला. कर्नाटकात कुणालाही बहुमत मिळालं नव्हतं तेव्हा जनता दलाने पाठिंबा दिला होता. तेव्हा मात्र ते सरकार कार्यकाळ पूर्ण करू शकलं नव्हतं, असं ध्रुव मेहता यांनी म्हटलं आहे.
पण विचारधारा वेगळी होती
बाळासाहेब ठाकरे यांनी एक विचार घेऊन पक्ष स्थापन केला होता. भाजप आणि शिवसेनेची निवडणुकीपूर्वी युती होती. दोघांची विचारधाराही सारखी होती. पण, काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जाऊन स्थापन केलेलं सरकार हे शिवसेना पक्षाच्या विचाराच्या विरोधातील होतं. त्यामुळेच शिवसेनेतील आमदार नाराज होते, असा युक्तिवादही यावेळी करण्यात आला.
आजच युक्तिवाद पूर्ण करा
यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी मेहता यांना आजच ही सुनावणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्याच्या सूचना केल्या. त्यावर माझाही तोच मानस आहे. मी आजच युक्तिवाद पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे, असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या कोणत्याही आमदाराने राजीनामा दिला नसल्याचं लक्षात आणून दिलं. तसेच या प्रकरणात दहाव्या अनुसूचीनुसार कारवाई करता येणार नसल्याचंही स्पष्ट केलं.
