साध्या जेवणाचीही चव वाढवेल ‘ही’ कढीपत्त्याची चटणी! झटपट 10 मिनिटात करा तयार!
इडली-डोसा असो किंवा साधे वरण-भात, कढीपत्त्याची ही चटणी तुमच्या जेवणाची चव वाढवेल. चविष्ट आणि हेल्दी चटणी १० मिनिटांत कशी तयार करायची, ते जाणून घ्या.

- भारतीय जेवण चटणीशिवाय काहीसे अपूर्णच वाटते. नाश्त्यापासून ते वर्ण भात, भाजी चपातीपर्यंत आपल्याला सोबतीला तिखट-आंबट चटणीची जोड मिळाल्यास जेवणाची मज्जा अजूनच वाढते.
- चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य : कढीपत्ता – १ ते २ कप (स्वच्छ धुवून कोरडा केलेला), चणा डाळ – १ मोठा चमचा, उडीद डाळ – १ मोठा चमचा, सुक्या लाल मिरच्या – ३ ते ४ (तुमच्या आवडीनुसार तिखटाचे प्रमाण कमी-जास्त करू शकता), चिंचेचा कोळ किंवा लिंबाचा रस – १ छोटा चमचा, लसूण – ३ ते ४ पाकळ्या (ऐच्छिक, जर तुम्ही लसूण खात असाल तर), मोहरी – १/२ छोटा चमचा, तेल – २ छोटे चमचे,मीठ – चवीनुसार
- पॅनमध्ये ते गरम करून त्यात सगळं चणा डाळ, उडीद डाळ, लसणाच्या पाकळ्या आणि वाळलेल्या लाल मिरच्या घालून परतून घ्या. प्लेटमध्ये कधीं थंड होऊ द्यात. आता, त्याच कढईत उरलेल्या तेलात ताजी कढीपत्त्याची पाने घालून परतून घ्या.
- भाजलेली डाळ, कढीपत्ता, चवीनुसार मीठ, चिंचेचा कोळ आणि गरजेनुसार थोडे पाणी घालून मिक्सरमध्ये फिरवून घ्या. चटणी खूप पातळ होणार नाही याची काळजी घ्या. ती थोडी घट्ट आणि जाडसर असेल तरच छान लागते. तयार झालेली चटणी एका बाऊलमध्ये काढून घ्या.
- आता या फोडणी द्या. फोडणीच्या पॅनमध्ये तेल घालून मोहरी, सुकी लाल मिरची आणि चिमूटभर हिंग घालून गरम करा आणि चटणीवर ओता आणि नीट मिसळून घ्या.
- एका हवाबंद डब्यात भरून फ्रिजमध्ये ३ ते ४ दिवस सहज साठवून ठेवू शकता. पुढच्या वेळी जेव्हा जेवण थोडे बेचव वाटेल, तेव्हा ताटात ही चटणी नक्की वाढून घ्या.
Follow Us






