फक्त चार महिन्यात या प्रसिद्ध अभिनेत्रीने मुंबईतले दोन फ्लॅट विकून कमावले इतके कोटी, आकडा ऐकून डोळे विस्फारतील

बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीने चार महिन्यात तिच्या दोन फ्लॅटची डील केली आहे. हे फ्लॅट विकून मिळालेल्या पैशांचा आकडा ऐकून तुमचे डोळे विस्फारतील.

| Updated on: Mar 06, 2026 | 4:04 PM
1 / 5
Preity Zinta Property Deal :  बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा अचानक चर्चेत आली आहे. यावेळी कुठल्या चित्रपटासाठी नाही, तर  प्रॉपर्टी डीलसाठी तिची चर्चा होतेय. प्रितीने मुंबईतील तिचा एका फ्लॅट विकल्याची माहिती आहे.

Preity Zinta Property Deal : बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा अचानक चर्चेत आली आहे. यावेळी कुठल्या चित्रपटासाठी नाही, तर प्रॉपर्टी डीलसाठी तिची चर्चा होतेय. प्रितीने मुंबईतील तिचा एका फ्लॅट विकल्याची माहिती आहे.

2 / 5

प्रीति झिंटाचा हा फ्लॅट मुंबईत वांद्रे पाली हिल येथे होता. मुंबईतील हा पॉश भाग आहे. तिथे अनेक स्टार्सची घरे आहेत. फ्लॅटचा एरिया 1770 चौरस मीटरचा आहे. हा फ्लॅट तिने 18.5 कोटी रुपयात विकला. हा फ्लॅट 11 व्या मजल्यावर होता. या प्रॉपर्टीच रजिस्ट्रेशन 2 मार्च रोजी झाली होती.

3 / 5

प्रितीने हा फ्लॅट भारतीय वंशाच्या एका अमेरिकी नागरिकाला विकला आहे. इमारत खूप जुनी झाली होती. या इमारतीचं रीडेवलपमेंट करण्यात आलं. रीडेवलपमेंट नंतर ज्यांचे पण फ्लॅट्स होते, सर्वांना नवीन फ्लॅट मिळाले आहेत. प्रितीलाही नवीन फ्लॅट मिळाला होता.

4 / 5

आता तोच रीडेवलपमेंटचा फ्लॅट प्रितीने विकलाय. हे पहिल्यांदा होत नाहीय, तर चार महिन्यांपूर्वी मागच्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात प्रिती झिंटाने मुंबईत तिचा दुसरा फ्लॅट 14 कोटी रुपयांना विकला होता. तिचा तो फ्लॅट याच इमारतीत होता.

5 / 5

त्या फ्लॅटचा एरिया 1474 चौरस मीटर होता. चार महिन्यापूर्वी प्रिती झिंटाने 32.5 कोटी रुपयात प्रॉपर्टी डील केली. प्रितीचे फॅन्स तिला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी आतुर आहेत. मागच्या अनेक वर्षांपासून ती चित्रपटात दिसलेली नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us