
अभिनेत्री राणी मुखर्जी हिच्याबद्दल सांगायच झालं तर, अभिनेत्रीने तिच्या 30 वर्षांच्या करियरमध्ये अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आजही अभिनेत्रीची लोकप्रियता चाहत्यांमध्ये कायम आहे. प्रेक्षक आजही राणीच्या आगामी सिनेमाच्या प्रतिक्षेत असतात.

राणी हिने आतापर्यंत मर्दानी, मर्दानी 2, गुलाम, कुछ कुछ होता है, बंटी और बबली, ब्लैक, हिचकी, तलाश, कभी अलविदा ना कहना, चलते चलते, बादल, हद कर दी आपने, हर दिल जो प्यार करेगा, चोरी चोरी चुपके चुपके आणि हम तुम यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे.

रिपोर्टनुसार, राणी मुखर्जी एका सिनेमासाठी जवळपास 7 कोटी रुपयांपेक्षा अधिक मानधन घेते... आज राणी तिच्या कुटुंबियांसोबत मुंबईत आलिशान आयुष्य जगत आहे. मुंबईत राणी पती आदित्य चोप्रा आणि मुलीसोबत राहते.

मिळालेल्या माहितीनूसार राणी हिच्या मुंबईतील बंगल्याची किंमत 30 कोटी रुपये आहे... राणीच्या कार कलेक्शनमध्ये देखील अनेक महागड्या गाड्या आहेत. रेंज रोव्हर वोग, बीएमडब्ल्यू 7 सीरीज, मर्सिडीज-बेंज S-क्लास आणि ऑडी A8 W12 अशा महागड्या गाड्या अभिनेत्रीकडे आहेत.

राणी हिच्या संपत्तीबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री नेटवर्थ 206 कोटी रुपये आहे. तर राणीच्या नवऱ्याची म्हणजे आदित्य चोप्रा याची नेटवर्थ 7 हजार 400 आहे. राणी कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.